Maharashtra Government Schemes : १ एप्रिलनंतर जन्मलेल्या मुली होणार लखपती! कसा घेता येईल सरकारी योजनेचा लाभ

Government Schemes For Girls : राज्य शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु केली आहे. यामध्ये १ एप्रिल आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलींना १ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
Maharashtra Government Schemes
Maharashtra Government SchemesSaam Tv
Published On

Lek Ladki Scheme (Govt. Scheme) For Girls:

राज्य शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु केली आहे. यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात १ एप्रिल आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलींना १ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला शासनाकडून ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे तसेच शिक्षणाबाबत (Education) त्यांना अधिक प्रोत्साहन देणे यासाठी सरकारने १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाहीये. त्यासाठी राज्य सरकारने ही योजना (Scheme) अधिक्रमित करुन नवीन लेक लाडकी योजना सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना (Girl) लागू होईल. काय आहे लेक लाडकी योजना? कसा घेता येईल लाभ?

Maharashtra Government Schemes
Bank Holiday In December 2023 : पुढील आठवड्यात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी? कारण काय?

1. लेक लाडकी योजना काय आहे?

  • माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करुन राज्यात १ एप्रिल २०२३ पासू मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे.

  • या योजनेंतर्गत १ लाख १ हजार रुपये मुलींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने येतील.

2. ही योजना कोणाला मिळणार?

योजनेंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ नंतर जन्मला येणाऱ्या मुलीला पैसे मिळतील.

Maharashtra Government Schemes
POMIS Scheme : पती-पत्नी कमावू शकतात लाखो रुपये, या सरकारी योजनेत करा गुंतवणूक

3. कोणती कागदपत्रे आवश्यक?

या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला मुलीचा जन्मदाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, आई-वडिलांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि शाळेचा दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com