Bank Holiday In December 2023 : पुढील आठवड्यात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी? कारण काय?

RBI Bank Holiday : रिझर्व्ह बँकेच्या बँक हॉलिडे लिस्टमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीनुसार वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँका बंद राहू शकतात. तसेच शनिवार आणि रविवार आल्याने देखील सुट्ट्यांमध्ये भर पडली आहे.
Bank Holiday In December 2023
Bank Holiday In December 2023Saam Tv
Published On

Bank Holidays in December 2023 :

डिसेंबर महिना सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात ते ख्रिसमसचे. ख्रिसमसमध्ये बऱ्याच शाळांना सुट्ट्या असतात. अशातच देशभरातील बँकांना सुट्टया असणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) बँक हॉलिडे लिस्टमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीनुसार वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँका (Bank) बंद राहू शकतात. तसेच शनिवार आणि रविवार आल्याने देखील सुट्ट्यांमध्ये भर पडली आहे.

1. किती दिवस राहाणार बँका बंद

यंदा ख्रिसमस हा २५ डिसेंबर सोमवारी येत असल्यामुळे सुट्टी असेल. याआधी २३ डिसेंबरला शनिवार आणि २४ डिसेंबरला रविवार आहे. २३ तारखेला चौथा शनिवार आल्याने या शनिवारी बँका बंद राहातील, म्हणजेच सलग तीन दिवस सुट्टी (Holiday) राहील.

Bank Holiday In December 2023
Gold Silver Rate (20th December 2023): सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचे दर

तसेच २६ आणि २७ तारखेला अनेक राज्यांमध्ये ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु होणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये २७ तारखेपर्यंत सुट्टी राहिल. म्हणजेच एकूण पाच दिवसांची सुट्टी राहाणार आहे.

2. ५ दिवस सुट्टी असेल का?

अनेक शहरांमध्ये २५ तारखेला ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे बँका फक्त ३ दिवस बंद राहतील. पण काही राज्यांमध्ये ५ दिवस सुट्टया असणार आहे.

Bank Holiday In December 2023
POMIS Scheme : पती-पत्नी कमावू शकतात लाखो रुपये, या सरकारी योजनेत करा गुंतवणूक

आरबीआयच्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, डिसेंबरमध्ये देशभरात १८ दिवस बँकांना सुट्ट्या राहाणार आहे. ज्यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

  • 23 डिसेंबर- चौथा शनिवार

  • 24 डिसेंबर - रविवार

  • 25 डिसेंबर 2023- ख्रिसमस

  • 26 डिसेंबर 2023- ख्रिसमस सेलिब्रेशन

  • 27 डिसेंबर आणि 30 डिसेंबर - ख्रिसमस आणि यू कियांग नांगबाह

  • 31 डिसेंबर- रविवार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com