जपानी दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवीन मॉडेलची बाईक लॉन्च करत असते. अशातच यामाहाने आपल्या नवीन संकल्पनेसह बाईकच नव मॉडेल आणलं आहे.
यामाहाचे हे नवीन मॉडेल अनेक जुन्या बाइक्सला टक्कर देईल. यामध्ये कंपनी मशीन आणि मानवासोबत पार्टनरशीप तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यामाहाच्या या बाईकचे नाव मोटोरॉइड २ असून कोणत्याही प्रकारच्या हँडलबारशिवाय लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकमध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे आतापर्यंत कोणत्याही बाईकच्या मॉडेलमध्ये देण्यात आले नाहीये. जाणून घेऊया इतर अनेक वैशिष्ट्य
या बाईकची (Bike) डिझाइन एखाद्या चित्रपटात दाखवलेल्या बाईकसारखी दिसतेय. ज्याचे फिचर्स, मॉडेल हे जबरदस्त असणार आहेत. यामध्ये ट्विस्टिंग स्विंगआर्म, एआय फेशियल रिकग्निशन आणि सेल्फ बॅलन्सिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करण्यात आला आहे. ही बाईक स्वत:चा समतोल सोबत स्टँडशिवाय आपल्या जागेवर उभी राहाते.
याशिवाय या बाइकमध्ये फेशियल रेकग्निशन सिस्टीम देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे ही बाईक मालकाचा चेहरा ओळखून इतर वैशिष्ट्य सक्रिय करेल. सध्या ही एक संकल्पना म्हणून मांडण्यात आली आहे. कंपनीने (Company) म्हटले की, मोटोरॉइड २ ही भविष्यात मानवी मशीन इंटरफेस कसे दिसेल हे पाहाणे अधिक उत्सुकतेचे असणार आहे.
मोटोरॉइड २ संकल्पनेत कंपनीने हँडलबारच्या जागी स्टड हँडग्रिप दिले आहेत. यामुळे बाइकला फ्युचरिस्टिक लुक मिळाला आहे. कंपनीने म्हटले की, मॉडेल रायडर आणि मशीन यांच्यातील डिस्टन्स कमी होईल. ज्यामध्ये यंत्र आणि मानव एकमेकांशी जोडीदाराप्रमाणे सुसंवादीपणे काम करतील. यामाहाने २०१७ मध्ये MOTOROiD चे पहिली सीरिज जगासमोर आणली होती. आता जपान मोबिलिटी शोमध्ये दुसऱ्या पिढीची MOTOROiD ही संकल्पना सादर केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.