परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, आता UPI ने पाठवता येणार डॉलर्स, कसं? ते जाणून घ्या

International Digital Payment: भारतात सर्वाधिक लोक डिजिटल पेमेंटचा वापर करतात. आता लवकरच ऑनलाइन पद्धतीने डॉलर पाठवता येणार आहे.
UPI Payment
UPI PaymentSaam Tv
Published On

Digital Payment Through UPI Internationally:

सध्या संपूर्ण जग डिजिटल झाले आहे. त्यामुळे सर्व कामे अगदी सोपी झाली आहे. पैसे पाठवण्यासाठी डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या पद्धतीने होत आहे. आजकाल लोक रोख पैसे न बाळगता UPI च्या माध्यमातून पैसै पाठवतात. भारतात सर्वाधिक लोक डिजिटल पेमेंटचा वापर करतात. मात्र, आतापर्यंत लोक फक्त रुपये पाठवू शकत होते. मात्र, आता लवकरच ऑनलाइन पद्धतीने डॉलर पाठवता येणार आहे.

आर्थिक व्यव्हार सोप्या पद्धतीने व्हावेत यासाठी रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार नवनवीन प्रयोग करत असतात. आता यूपीआयने डॉलरमध्ये व्यव्हार करणे शक्य होणार आहे. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इंटरनॅशनल स्विफ्ट बँकिंग सिस्टमशी बोलणी सुरू केली आहे.

UPI Payment
Masked Aadhaar Card: हॉटेलमध्ये रूम बूक करताना आधार कार्ड देताय? सावधान! तुमचं बँक खातं रिकामं होण्याआधी करा 'हे' बदल

यूपीआयने देशात आर्थिक व्यव्हार केले जात आहे. परंतु, इतर देशातील चलनातील व्यव्हार सुरक्षित होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे बाहेरगावी फिरायला दाण्यासाठी, परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे पाठवणे सोपे होणार आहे.

काय आहे स्विफ्ट बँकिंग सिस्टम

बाहेरील देशांमध्ये आर्थिक व्यव्हार स्विफ्ट सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन माध्यमातून होतात. हे व्यव्हार करण्यासाठी स्विफ्ट कोडचा वापर जातो. परवानगी मिळाल्यास यूपीआयचे आंतरराष्ट्रीय व्यव्हार याच माध्यमातून होतील.

यामुळे इतर देशांत पैसे पाठवणे शक्य होणार आहे. देशांमधील डिजिटल व्यव्हार सोप्या पद्धतीने होणार आहेत. याचसोबत यूपीआय व्यव्हाराची व्याप्ती वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

UPI Payment
Fixed Deposit मोडताय? या गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा होऊ शकते नुकसान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com