IPS अमित लोढा यांचा प्रेरणादायी प्रवास
आयआयटी दिल्लीमध्ये आला होता आत्महत्येचा विचार
मोठ्या जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली यूपीएससी
प्रशासकीय सेवेस रुजू होऊन काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. समाजासाठी काहीतरी करावे, या उद्देशाने अनेकजण यूपीएससी परीक्षा देतात. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस आणि आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा परिस्थिती खूप वाईट असते. परंतु ही परिस्थिती बदलून टाकण्याची ताकददेखील आपल्यातच असते. असंच काहीसं आयपीएस अमित लोढा यांनी केलं आणि त्यांनी संपूर्ण परिस्थिती बदलून टाकली. एकेकाळी आत्महत्या करावी असा विचार करणारे ते आज आयपीएस अधिकारी म्हणून देशात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या अमित लोढा यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा.
आयपीएस अमित लोढा यांनी समाजासाठी खूप काम केले आहे. त्यांना पाहून गुन्हेगारांच्या पायाखालची जमीन सरकते.त्यांच्या आयुष्यात एक क्षण असा आला होता की, ते खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांना खूप त्रास झाला होता.
अमित लोढा यांनी आयआयटी दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांना गणित विषयात खूप कमी गुण मिळायचे. त्यांचे गणित विषयातील गुण सातत्याने कमी व्हायचे. याच विषयामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता.
दरम्यान, त्यांनी यानंतर यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या २५व्यावर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. यावेळी यूपीएससी परीक्षेसाठी मुख्य विषय म्हणून त्यांनी गणित हा विषय निवडला होता.ज्या विषयाची त्यांना सर्वात जास्त भीती वाटायची. तोच विषय त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.