
दहावीत नापास तरीही हार मानली नाही
वडिलांच्या सल्ल्याने आयुष्याला कलाटणी
चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली यूपीएससी
प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अपयशाचा सामना करावा लागतो. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. त्यामुळे अपयशामुळे कधीही खचून जायचं नाही. याचंच एक उदाहरण म्हणजे ईश्वर गुर्जर. १०वी पास ईश्वर गुर्जर यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली आहे.
१०वीत नापास झाले तरीही खचले नाहीत. त्यांनी २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. यूपीएससी परीक्षेतही त्यांना तीन वेळा अपयश आले. तरीही ते या अपयशामुळे डगमगले नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्याचचं यश त्यांना मिळालं. (UPSC Success Story)
ईश्वर गुर्जर हे राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील रहिवासी. त्यांनी २०२२ मध्ये ६४४ रँक प्राप्त केली. ईश्वर यांचे वडील हे शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहेत. एकदम सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या ईश्वर गुर्जर यांनी यूपीएससी परीा पास केली आहे. वडील शेती करायचे परंतु त्यांनी कधीच मुलांच्या शिक्षणात तडजोड केी नाही.
१०वीत झाले होते नापास
ईश्वर यांनी सांगितले होते की, २०११ मध्ये जेव्हा त्यांनी दहावीची परीक्षा दिली. तेव्हा ते नापास झाले होते. यानंतर त्यांनी शिक्षण सोडण्याचा विचार केला होता. परंतु त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ईश्वर यांना धीर दिला. एवढ्या लवकर घाबरण्याची गरज नाही. एकदा अपयश आले म्हणून हिम्मत सोडायची नाही. यानंतर त्यांनी पुन्हा दहावीची परीक्षा दिली. २०१२ मध्ये त्यांना ५४ टक्के गुण मिळाले होते. तर १२वीत ६८ टक्के गुण मिळाले होते.
तीन वेळा यूपीएससीत फेल
ईश्वर गुर्जर यांनी बीएपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर ते थर्ज ग्रेड टीचर म्हणून कार्यरत झाले. याचसोबत त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. ईश्वर यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. २०१९ मध्ये त्यांनी प्रिलियम्स परीक्षादेखील पास केली नव्हती. २०२० मध्ये त्यांना इंटरव्ह्यूमध्ये अपयश मिळाले. २०२१ मध्ये पुन्हा त्यांना अपयश आले. तीन वेळा अपयश मिळाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.