Saam Tv
रोज भाजीला काय बनवायचं? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा हिरव्या मिरच्यांचा ठेचा आहे.
तुम्हाला काही तर्री वाला ठेचा आणि चवीला झणझणीत काही खावसं वाटत असेल तर ही रेसिपी लगेचच करा.
हिरव्या मिरच्या, दही, जीरे मोहरी, तेल, मीठ, हळद, धणे पावडर, जीरे पावडर, मालवणी मसाला.
सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या धुवून त्यांचे देठ काठून मिक्सरमध्ये बारिक करा.
आता एका कढईत तेल तापवा.
तेल तापवल्यानंतर त्यात जीरे-मोहरी घाला. ती परतवून घ्या.
आता त्यामध्ये मिरची परता. मिरच्या एकदम सॉफ्ट करून घ्या.
पुढे त्यात दही आणि मसाले घालून ५ मिनिटे छान परतून घ्या.
तायर आहे तुमची चटपटीत आणि झटपट भाजी.