Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दहावीत फक्त ५७ टक्के, कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यास नकार, मोठ्या जिद्दीने IAS झाला, वाचा आकाश कुल्हारी यांचा प्रवास

Success Story of IPS Akash Kulhari: आयपीएस आकाश कुल्हारी यांनी अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांना दहावीत फक्त ५७ टक्के गुण मिळाले होते.तरीही तयांनी मोठी जिद्दीने अभ्यास केला.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा पास करुन अनेकांना आयएएस आणि आयपीएस ऑफिसर व्हायचे असते. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायचा म्हटल्यावर दिवसरात्र मेहनत करावी लागते. आयपीएस आकाश कुल्हारी यांनीदेखील खूप मेहनत घेतली आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. आयपीएस आकाश कुल्हारी यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

आयपीएस आकाश कुल्हारी यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेरचा आहे. ते शालेय अभ्यासात हुशार नव्हते. परंतु तुम्ही खूप मेहनत घेतली की तुम्हाला यश हे मिळतेच याचं उत्तम उदाहरण म्हणजे आकाश कुल्हारी हे आहेत. ते शाळेत असताना फार हुशार नव्हते. परंतु कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता यायला हवी आणि आपले लक्ष्य साध्य करता यायला हवे.

आयपीएस आकाश कुल्हारी यांना १०वीत खूप कमी गुण होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बीकानेर, राजस्थान येथे झाले. त्यांना १०वीत फक्त ५७ टक्के गुण होते. त्यामुळे ११वीत त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचे अॅडमिशन केंद्रीय विद्यालय, बीकानेर येथे केले. यानंतर त्यांनी खूप मेहनत घेतली आणि १२वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवले.

केंद्रीय विद्यालयात त्यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळाले असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी १२वीनंतर दुग्गल कॉलेजमधून बीए डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून एमए केले. त्यांनी एमफीलसाठी अॅडमिशन घेतले आणि सोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

आकाश कुल्हारी हे २००६ च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. त्यांना यूपीएससीपरीक्षेत २७३ रँक प्राप्त झाली होती. त्यांनी अनेक तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कितीही कमी गुण मिळाले तरीही तुम्ही हिम्मतीच्या जोरावर कोणतीही परीक्षा पास करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia-Ukraine Tension: रशिया युक्रेन युद्ध पुन्हा सुरु, रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला

Mumbai Dadar Fire: दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना आग; 12 वाहने जळून खाक

Ganesh Mandap: गणेश मंडपात पुजाऱ्यासोबत चमत्कार? बेशुद्ध पडलेला पुजारी थेट उठून बसला?

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचं श्रेय फडणवीसांचं, राऊतांनी गायलं फडणवीसांचं गुणगान

Maharashtra Live News Update: दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना लागली आग, १० ते १२ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

SCROLL FOR NEXT