Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ९व्या वर्षी घरोघरी जाऊन पेपर विकले, परदेशातील नोकरी सोडली; भारतात येऊन USPC परीक्षा क्रॅक; IFS पी बालागुरुगन यांचा प्रवास

Success Story of IFS P Balamurugan: आयएफएस पी बालागुरुगन यांनी परदेशातील नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी खूप खडतर परिस्थितीतून मार्ग काढले आणि यश मिळवले.

Siddhi Hande

प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही अडचणी असतात. परंतु या अडचणींवर मात कशी करायची हे आपणच ठरवायचं असतं. आपणच परिस्थिती बदलू शकतो. त्यामुळे आपलं पुढचं भविष्य खूप सुखी होतं. असंत काहीसं बालामुरुगन पी यांनी केलं. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

८ भावंडांचे कुटुंब, वडील दारु प्यायचे त्यामुळे खूपच बिकट परिस्थिती होती. आणि आई एकटी घरासाठी राबायची आणि मुलांचे पालण पोषण करायची. परंतु परिस्थिती कशीही असली तरीही त्यावर मात आपण करायची असते. असंच काहीसं बालामुरुगन पी यांनी केलं. ते वन विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

खडतर परिस्थितीतून मार्ग काढला

आयएफएस पी बालागुरुगन हे मूळचे चेन्नईतील कीलकट्टलाई येथील रहिवासी. त्यांचे बालपण खूप गरिबीत गेले. परंतु तरीही शिक्षण कधीच सोडले नाही. त्यांची आई दहावी पास होती. ८ भावंडांचे पालनपोषण करताना त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांचे वडील दारु प्यायचे ते १९९४ मध्येच घर सोडून गेले होते.

आर्थिक परिस्थिती वाईट होती. त्यांची आई आणि मामा कसंतरी घरखर्च भागवायचे. त्यांचे संपूर्ण घर २ खोलींच्या घरात राहायचे. परंतु यामुळे त्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा आला नाही. त्यांनी नेहमी अभ्यासाला महत्त्व दिले.मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईने घरदेखील विकले होते.

बालागुरुगन हे खूप हुशार होते. त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वर्तमानपत्र विकले. त्यांनी ९ वर्षांचे असतानाच काम करायला सुरुवात केली. जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांनी वर्तमानपत्र विक्रेत्याकडे पेपर वाचायला मागितला. तेव्हा त्याने महिन्याने ९० रुपये लागतील असं सांगितलं. परंतु ते पैसेदेखील त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी वर्तमानपत्र विकायचे काम केले. त्यातून पेपर खरेदी करायचे.

बीटेकनंतर नोकरी

शालेय शीण पूर्ण झाल्यानंतर २०११ मध्ये त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर कॅम्पस प्लेसमेंटद्वारे त्यांना टीसीएसमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांची परिस्थिती बदलली.

यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियात नोकरीची संदी मिळाली. तेव्हाच त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे ठरवले. त्यांनी काही वर्ष विदेशात नोकरी केली. त्यानंतर भारतात परतले. त्यांन यूपीएससी परीक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले. परंतु तरीही त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. त्यांनी सारखे प्रयत्न केले.त्याचं यश त्यांना मिळालं आणि त्यांची आयएफएस अधिकारी म्हणून निवड झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Food Delivery Scam : संतापजनक! ऑनलाईन मागवलेल्या अंड्यांमध्ये आढळल्या अळ्या, विरारमध्ये नेमकं काय घडलं?

PCOS vs Thyroid Test: पीसीओएस की थायरॉइड समस्या? 'या' चाचण्यांच्या माध्यमातून समजू शकतो फरक

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Wikipedia ला टक्कर देणार 'हे' नवं सॉफ्टवेअर, एलोन मस्कची घोषणा

Navneet Rana: 'तुझ्यावर मुलासमोर बलात्कार करु...'; नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT