Success Story: परदेशातील नोकरी सोडली, भारतात बनल्या रिसेप्शनिस्ट, मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IPS पूजा यादव यांचा प्रवास

Success Story Of IPS Pooja Yadav: पूजा यादव यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. यूपीएससी परीक्षेसाठी त्यांनी परदेशातील चांगल्या पगाराची नोकरी सोडली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक दिवसरात्र मेहनत घेतात. परंतु अनेकदा आपल्याला स्वप्ने बाजूला ठेवून दुसरीच नोकरी करावी लागते. परंतु ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ येतेच. असंच काहीसं पूजा यादव यांच्यासोबत झालं. त्यांनी परदेशातील नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा दिली.

Success Story
Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

पूजा यादव यांचा प्रवास (IPS Pooja Yadav Success Story)

पूजा यादव यांचा जन्म २० सप्टेंबर १९८८ रोजी हरियाणा येथे झाला. त्या एकदम सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण हरियाणामधूनच पूर्ण केले. यानंतर त्यांनी बायोटेक्नोलॉजीमध्ये बी.टेक (B. Tech) आणि फूड टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंटमध्ये एम.टेक (M. Tech) केले.

परदेशात शिक्षण आणि नोकरी

पूजा या उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्या. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ जर्मनी आणि कॅनडामध्ये नोकरी केली. याच काळात त्यांना देशसेवेसाठी योगदान देण्याचा विचार आला. त्यामुळे त्या भारतात परतल्या आणि यूपीएससी परीक्षा पास केली.

Success Story
Success Story: सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS अधिकारी; एकदा नाही तर दोनदा केली UPSC क्रॅक; अपराजिता राय यांचा प्रेरणादायी प्रवास

स्वतःचा खर्च स्वतः उचलला

जर्मनीमधील नोकरी सोडून पूजा या परत भारतात आल्या. त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांच्या कुटुंबाने त्यांना पाठिंबा दिला. मिडिया रिपोर्टनुसार, यूपीएससी परीक्षेच्या तयारीच्या काळात स्वतः चा खर्च उचलण्यासाठी ट्यूशन घेतले. त्यांनी रिसेप्शनिस्टचीदेखील नोकरी केली होती.

पहिल्या प्रयत्नात अपयश

यूपीएससी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. परंतु त्यांनी हार मानली नाही.पूजा यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक १७४ प्राप्त केली.यानंतर त्या आयपीएस पदावर रुजू झाल्या. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Success Story
Success Story: वडील वीट भट्टीत कामाला, आई धुणीभांडी करायची, लेक २२व्या वर्षी झाला IPS; सफीन हसन यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com