Bogus Doctor
Bogus DoctorSaam tv

Bogus Doctor : बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे; पदवी नसताना रुग्ण तपासणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur News : बोगस डॉक्टरांची आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत ऐवळे यांनी सर्व चौकशी करून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बोगस डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला
Published on

सोलापूर : रुग्णांच्या जीवाशी खेळ करत कोणतेही वैद्यकीय शिक्षण झाले नसताना रुग्णांची तपासणी केली जात असल्याचा प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन बोगस डॉक्टरांविरोधात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली असून वैद्यकीय पदवी नसणाऱ्या दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वारंवार समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षणाची पदवी न घेता देखील केवळ एखाद्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करून घेतलेल्या अनुभवाच्या जोरावर आपली स्वतंत्र रुग्ण तपासणी करत असतात. खरेखुरे डॉक्टर असल्याचे दाखवत रुग्णांच्या जीवाची पर्वा न करता त्यांची तपासणी करत त्यांना औषधी देत असतात. असाच प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यात समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

Bogus Doctor
Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

मंदिरात करत होते रुग्ण तपासणी 

उत्तर सोपलूर तालुक्यातील वडाळा येथे एका मंदिरात वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांना तपासणी करून औषध दिली जात असल्याचे समोर आले आहे. असे करणाऱ्या दोन डॉक्टरांचे पितळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उघड पाडले आहे. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीरेंद्र भालचंद्र जाधव व कलीम इब्राहिम शेख या दोन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Bogus Doctor
Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

तपासणीसाठी घेत होते ७०० रुपये 

वीरेंद्र जाधव आणि कलीम शेख हे स्वतःला डॉक्टर म्हणून घेत होते. तर पाच ते सहा महिला स्वतःला नर्स म्हणून उपचार रुग्णांना देत असल्याचे प्रकार समोर आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत ऐवळे यांनी अधिक विचारपूस करत वैद्यकीय प्रमाणपत्रे मागितले. सदर डॉक्टरांनी सर्टिफिकेट न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली. सदर बोगस डॉक्टर हे तपासणीसाठी रुग्णांकडून पाचशे ते सातशे रुपये घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांसमोर बोगस डॉक्टर म्हणलं, 'मी कुठे म्हणालो, मी डॉक्टर आहे. मी तर फक्त जडिबुटी देत आहे', असा खुलासा देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com