Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Ahilyanagar Sangamner News : धक्काबुक्की करणारे बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. या मोर्चासाठी भाजप अध्यात्मिक सेलचे तुषार भोसले देखील उपस्थित राहणार आहेत
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेर तालुका शांतता आणि बंधुभाव असणारा तालुका आहे. हरिनाम सप्ताह हा वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचे व्यासपीठ आहे. या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे लोक येतात त्यामुळे राजकीय वक्तव्य नको. मात्र संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचं काम काही शक्ती करत असल्याचे भाष्य काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कीर्तनात झालेल्या राजकीय भाष्य गोंधळावर केले आहे. 

संगमनेर शहरातील घुलेवाडी गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन करणाऱ्या हभप संग्रामबापू भंडारे यांनी राजकीय भाष्य केल्याने कीर्तना दरम्यान गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. भंडारे महाराजांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करत आज संगमनेर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे, यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

Balasaheb Thorat
Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

गोंधळ घालणारे आणि धक्काबुक्की करणारे बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. या मोर्चासाठी भाजप अध्यात्मिक सेलचे तुषार भोसले देखील उपस्थित राहणार आहेत. हा सगळा प्रकार राजकीय वादातून झाल्याची प्राथमिक माहिती असून तुकाराम महाराजांवर आधारित कीर्तन असताना राजकीय भाष्य केल्याचा आरोप करण्यात येतो आहे. मात्र आपल्या गावातील सुसंस्कृत संस्कृती व बंधुभाव टिकवण्याची जबाबदारी आता जनतेची असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. 

Balasaheb Thorat
Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न 

कीर्तन करण्यात येत असलेल्या  व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य केल्यानं काहींनी शांततेच्या मार्गाने विरोध केला. मात्र त्यानंतर खोटे गुन्हे दाखल केले गेले. माणसांमध्ये भेद निर्माण करून तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहे. विधानसभेआधी देखील असाच एक मोर्चा निघाला होता. आता पुन्हा निवडणुका जवळ आल्याने आज मोर्चा काढण्यात येत आहे. नेमकं काय झालं हे समजून घेण्याची कोणाला गरज वाटत नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com