Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जिद्द! दिवसा नोकरी, रात्री अभ्यास; कोचिंग क्लासेसशिवाय UPSC क्रॅक केली, IAS श्वेता भारती यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Shweta Bharti: श्वेता भारती यांनी नोकरी करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यांनी दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत करणे हा एकच मार्ग आहे. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कामात सातत्य आणि इच्छाशक्ती ठेवणे गरजेचे आहे. असं केल्याने कोणत्याही परीक्षेत तुम्ही चांगल्या गुणांनी पास होणार. असंच काहीसं आयएएस श्वेता भारती यांच्यासोबत झालं.

श्वेता भारती यांना देशातील सर्वात अवघड परीक्षा यूपीएससी क्रॅक केली आहे. नोकरी करत त्यांनी यूपीएससी परीक्षेचाही अभ्यास केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाना यशदेखील मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, श्वेता यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय अभ्यास केला आहे.

श्वेता यांनी यूपीएससी परीक्षेच्या आधी बिहारची बीपीएससी परीक्षा पास केली होती. परंतु त्यांचे आयएएस ऑफिसर होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

सरकारी नोकरी मिळूनदेखील त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. या काळात त्यांना ९ तासांची नोकरी करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

श्वेता यांचा जन्म बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून झाला. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण इशान इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. त्यानंतर इंजिनियरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशनमधून बीटेक केले. यानंतर त्यांनी विप्रो या कंपनीत नोकरीदेखील मिळाली होती.

विप्रो कंपनीत त्यांना चांगले पॅकेजदेखील मिळाले होते. परंतु त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना नोकरी सोडणे अशक्य होते. त्यामुळे दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास करायच्या.

श्वेता यांनी २०२० मध्ये बीपीएससीमध्ये ६५ रँक मिळवली. त्यांना सरकारी नोकरीदेखील मिळाली. असं असतानाही त्यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्ष दिली आणि ३५६ रँक मिळवली. त्या सध्या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT