Success Story Saam Tv
बिझनेस

UPSC Success Story : बस कंडक्टरची लेक पहिल्याच प्रयत्नात IAS झाली, वाचा डॉ. रेनू राज यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story IAS Renu Raj: आयएएस रेनू राज या अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी मेडिकल फिल्ड सोडले. यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

Siddhi Hande

IAS रेनू राज यांचा प्रेरणादायी प्रवास

आधी डॉक्टर झाली नंतर यूपीएससी दिली

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत मिळवली दुसरी रँक

आयएएस डॉ. रेनू राज या निर्भीड आणि कर्तुत्वान अधिकाऱ्यांपैकी एक आहे. आयएएस रेनू राज यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्या अनेक तरुणांसाठी प्रेरणा आहेत. डॉ. रेनू राज या खूप गरीब कुटुंबात जन्माला आल्या. त्यांनी सुरुवातीला एमबीबीएस डिग्री प्राप्त केली. त्यांनी काही वेळ डॉक्टर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. त्या आयएएस अधिकारी झाल्या. (IAS Renu Raj Success Story)

डॉ. रेनू राज केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी. त्यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. परंतु त्यांच्या आईवडिलांनी कधीच मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमी पडून दिली नाही.

रेनू राज यांचे वडील बस कंडक्टर होते. आई गृहिणी आहेत. रेनू या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांना डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची होती. त्यामुळे त्यांनी मेडिकल फिल्ड निवडली.

शिक्षण

डॉ. रेनू राज यांनी सुरुवातीचे शिक्षण केरळमधील कोट्टायम येथील सेंट तेरेसा हायर सेकंडरी स्कूलमधूनघेतले. त्यानंतर त्यांना कोट्टायम येथील सरकारी कॉलेजमधून एमबीबीएस डिग्री प्राप्त केली.त्यानंतर त्यांनी काही दिवस प्रॅक्टिस केली. डॉक्टर बनल्यानंतर त्यांनी २०१३ मध्ये डॉक्टरसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास

रेनू राज यांनी काम करता करता यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांच्या मेहनतीला यश मिळाले. २०१४ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.एवढेच नाही तर त्यांनी परीक्षेत दुसरी रँक प्राप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: घर नाही तालीम नाही, नंदी बैल फिरवणाऱ्याच्या लेकाने पटकावलं सुवर्णपदक; कुस्तीपटू सनी फुलमाळीचा प्रवास

Pune Kukri Gang : पुण्यात कोयत्यानंतर 'कुकरी' गँगची एन्ट्री, दिवसाढवळ्या तरुणाची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shocking: मोलकरणीचं भयंकर कृत्य, लिफ्टमध्ये कुत्र्याला आपटून आपटून मारलं; पाहा VIDEO

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

SCROLL FOR NEXT