Success Story: आधी MBBS केलं, नंतर कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अर्तिका शुक्ला यांचा प्रवास

Success Story lof IAS Artika Shukla: आयएएस अर्तिका शुक्ला यांचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी सुरुवातीला एमबीबीएस डिग्री प्राप्त केली त्यानंतर यूपीएससी परीक्षा पास केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IAS अर्तिका शुक्ला यांचा प्रेरणादायी प्रवास

आधी MBBS केलं नंतर UPSC परीक्षा दिली

पहिल्याच प्रयत्नात UPSC केली क्रॅक

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा पास करुन अनेकांना प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे असते. परंतु यासाठी दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. तुम्ही जर मेहनतीने अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. असंच काहीसं अर्तिका शुक्ला यांनी केलं. आधी एमबीबीएस केलं त्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली.

Success Story
Success Story: लेकीला खाकी वर्दीत पाहायचं स्वप्न, दुसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; वडिलांसाठी पूजा अवाना झाल्या IPS

यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कोचिंग क्लासेस लावावे लागतात. परंतु अर्तिका यांनी कोणच्याही कोचिंग क्लासेसशिवाय ही परीक्षा पास केली आहे. अनेकांना यूपीएससी परीक्षेत अनेकदा अपयश येते. परंतु त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे. त्यांनी आपल्या दोन भावांच्या मदतीने आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

आधी डॉक्टर मग IAS अधिकारी

अर्तिका शुक्ला या मूळच्या वाराणसीच्या रहिवासी. त्यांची आई हाउसमेकर आहे तर वडील डॉक्टर आहे. त्यांना दोन मोठे भाऊ आहेत. त्यांनीदेखील यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यानंतर त्यांनी लहान बहिणीलादेखील प्रोत्साहन दिले आणि त्यांनीही परीक्षा पास केली.

अर्तिका यांनी वाराणसीतील सेंट जॉन्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्या अभ्यासात नेहमीच हुशार होत्या. त्यांना शाळेत असतानाच विज्ञान आणि गणित विषय खूप आवडायचा. त्यानंतर त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

Success Story
Success Story: लहानपणी गाई चरायला घेऊन जायच्या, लग्नासाठी कुटुंबाकडून दबाव, तरीही मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सी वनमथी यांचा प्रवास

MBBS केलं, त्यानंतर MD साठीही अॅडमिशन घेतलं

अर्तिका यांनी दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. यानंतर त्यांनी इंटर्नशिप केली. यानंतर त्यांनी एमडीचे शिक्षण घेतले. परंतु त्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा निर्माण झाली. त्यावेळी त्यांनी एमडी सोडण्याचा निर्णय घेतला.

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक

२०१४ मध्ये त्यांनी एमडीचे शिक्षण अर्धवट सोडले आणि यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी केवळ ८ महिन्यांच्या कालावधीत यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. त्यांनी सेल्फ स्टडी आणि ऑनलाइन स्टडी मटेरियलवरुन अभ्यास सरु केला. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली.फक्त यूपीएससी परीक्षा पास केली नाही तर त्यांनी चौथी रँकदेखील प्राप्त केली. त्या आज आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Success Story
Success Story: वडिलांचे छत्र हरपलं, कोणत्याही कोचिंगशिवाय एकदा नव्हे तर दोनदा केली UPSC क्रॅक; IAS दिव्या तंवर यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com