Success Story Saam tv
बिझनेस

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Madhav Agarwal: आयएएस अधिकारी यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. ते पाचव्या प्रयत्नात आयएएस अधिकारी झाले आहेत. त्याआधी त्यांनी सीए परीक्षा पास केली. त्यानंतर आयपीएस झाले आणि नंतर आयएएस अधिकारी झाले.

Siddhi Hande

IAS माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

पाचव्या प्रयत्नात झाले IAS अधिकारी

आधी CA, मग IPS अन् आता IAS अधिकारी

अनेकदा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं आणि आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं होतं. परंतु जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजून तुम्ही त्यातून पुढे जायला हवं. भविष्यात काहीतरी चांगलंच होणार असतं. असंच काहीसं आयएएस अधिकारी माधव अग्रवाल यांच्यासोबत झालं. त्यांना सीए व्हायचं होतं. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले परंतु त्यासोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षादेखील क्रॅक केली.

आयएएस माधव अग्रवाल यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. ते मूळचे ग्वालियरचे रहिवासी.ते लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. फक्त अभ्यास नव्हे तर स्पोर्ट्समध्येही त्यांनी चांगली कामगिरी केली होते. त्या राज्यस्तरीय हॉकी खेळाडू होते. माधव अग्रवाल हे ५व्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करत आयएएस झाले.

माधव अग्रवाल यांचे वडील बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या आई गृहिणी आहेत. माधव यांच्या घरी लहानपणापासूनच अभ्यासू वातावरण होते. ते खूपच हुशार होते. माधव अग्रवाल हे २०२४च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी ५व्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

माधव यांनी नरसी मोंजी कॉलेजमधून बी.कॉम केले. माधव हे २०१९ मध्ये सीए झाले. परंतु त्यांच्या वडिलांचे स्वप्न मुलाने सिव्हिल सर्व्हिसमध्ये जावे, असं होतं. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.२०२० पासून माधव यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

माधव यांना यूपीएससी परीक्षेत तीन वेळा अपयश आले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी चौथ्या प्रयत्नात परीक्षा पास केली. त्यानंतर ते आयपीएस अधिकारी झाले. परंतु त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी ऑल इंडिया रँक १६ प्राप्त केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT