Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडिलांच्या स्वप्नासाठी ८-८ तास अभ्यास; UPSCत पहिली आली, इशिता किशोर यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Ishita Kishore: इशिता किशोर यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्यांनी आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून तिने हे यश मिळवले आहे.

Siddhi Hande

यूपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते. असंच स्वप्न इशिता किशोर यांनी बघितले आणि पूर्णदेखील केले. त्यांनी यूपीएससी २०२२ परीक्षेत पहिला रँक प्राप्त केला. त्यांच्या या यशामुळे कुटुंबियांना खूप आनंद झाला होता.

इशिता यांचा प्रवास (Ishita Kishore Success Story)

इशिता या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांचे आयएएस होण्याचे सवप्न होते. त्यामुळे त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना यशदेखील मिळाले. इशिरा यांनी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांचे एअर फोर्स भारती स्कूलमधून शिक्षण पूर्ण झाले.

तिसऱ्या प्रयत्नात यश

इशिता यांचे वडील एअरफोर्स ऑफिसर होते. ते ग्रेट नोएडात राहतात. इशिता यांनी इकोनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.

इशिता यांचे वडील किशोर हे वायुसेनेत अधिकारी होते. २००४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची आई प्रायव्हेट शाळेत शिक्षिका होती. तर मोठा भाऊ वकील आहे. भारती यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अपयशादेखील पचवले.

इशिता यांचा अभ्यास

इशिता किशोरी या दिवसाला ८-९ तास अभ्यास करायच्या. त्यांनी सर्वात अवघड परीक्षेत पहिला रँक प्राप्त केला. त्यांना सलग दोनदा अपयश मिळाले. खूप मेहनत करुनही अपयश मिळाल्याने त्यांना निराशा वाटत होती. परंतु त्यांनी कधी प्रयत्न सोडले नाही. त्यांनी सतत आपले प्रयत्न सुरु ठेवले. या प्रयत्नांचे त्यांना यशदेखील मिळाले. त्या २०२२ च्या बॅचच्या यूपीएससी परीक्षेत टॉपर होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT