Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १०वीत फक्त ४४ टक्के, तब्बल १३ वेळा अपयश, जिद्द सोडली नाही, UPSC क्रॅक केलीच;IAS अवनीश शरण यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Awanish Sharan: आयएएस अवनीश शरण यांना तब्बल १३ वेळा अपयश आले तरीही त्यांनी हार मानली नाही. IAS अवनीश यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येकाला कधी न कधी अपयश येते. कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच काहीसं आयएएस अधिकारी अवनीश शरण यांच्यासोबत झाला. तब्बल १३ वेळा अपयश मिळाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली.

अवनीश शरण यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही कमी गुण मिळाले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही.त्यांनी सतत प्रयत्न केले आणि त्याचे यश त्यांना मिळाले.

IAS अवनीश शरण हे मूळच्या बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्याचे रहिवासी. ते नेहमी सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. त्यांनी एकदा त्यांचे १०वी, १२वी आणि ग्रॅज्युएशनचे गुण सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांना १०वीत फक्त ४४.७ टक्के गुण मिळाले होते. १२वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये ६० टक्के गुण मिळाले होते. परंतु त्यांनी सतत प्रयत्न केले आणि २००२ मध्ये यूपीएससी (UPSC) ऑल इंडिया १०वी रँक मिळवली.

सुरुवातीला अवनीश शरण यांनी संयुक्त रक्षा सेवा, केंद्रीय पुलिस बल या परीक्षा दिल्या. या दोन्ही परीक्षा यूपीएससीद्वारे घेतल्या जातात. परंतु त्यांना या परीक्षांमध्ये यश मिळाले नाही. याचसोबत त्यांनी राज्य पीसीएस प्रारंभिक परीक्षेत १० वेळा प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले. अवनीश हे यूपीएससी सीएसईच्या पहिल्या अटेंप्टमध्ये इंटरव्ह्यू राउंडपर्यंत पोहचले होते. परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि यश मिळवलेच.

अवनीश यांचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश हे मिळालेच. सतत प्रयत्न केल्यावर यश गाठण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असं त्यांनी दाखवून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT