Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: बुटकी म्हणून चिडवलं, पण हार मानली नाही, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS आरती डोगरा यांची यशोगाथा

Success Story of IAS Arti Dogra: कमी उंची म्हणून लोकांनी हिणवलं परंतु हार न मानता आरती डोगरा यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. आरती डोगरा यांची कहाणी सर्वांना प्रेरणा देईल.

Siddhi Hande

अनेकदा लोक आपल्याला आपला रंग, दिसणे, उंची या गोष्टींच्या आधारावर आपण किती योग्य आणि अयोग्य आहोत हे ठरवतात. परंतु आपल्या दिसण्यावरुन आपली क्षमता ठरत नाही. आपलं काम आणि कर्तृत्व याच्या आधारावर आपण किती सक्षम आहोत हे कळते. असंच काहीसं आयएएस ऑफिसर आरती डोगरा यांच्यासोबत झालं. त्यांची उंची केवळ ३.५ फूट आहे. त्यामुळे त्यांची लोकांनी खूप खिल्ली उडवली. मात्र, त्यांनी कधीच या गोष्टींचा विचार केला नाही. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले. (Success Story)

आरती डोगरा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. आरती या मूळच्या डेहराडून, उत्तराखंडच्या रहिवासी.त्यांचे वडिल कर्नल राजेंद्र आहेत. तर आईच नाव कुमकुम डोगरा असे आहेत. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. (Success Story Of IAS Arti Dogra)

आरती यांना लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्या सामान्य शाळेत शिकू शकणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी या परिस्थितीवरदेखील मात केली. त्यांनी डेहराडूनच्या प्रतिष्ठित गर्ल्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अर्थशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केले. (Inspirational Story)

आरती डोगरा यांना पहिल्यापासूनच शारीरिक भेदभावाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी याकडे कधीच लक्ष दिले नाही. आरती या कॉलेजमध्ये होत्या तेव्हा त्या डेहराडूनच्या डीएम मनीषा यांना भेटल्या होत्या. त्यांच्याकडूनच त्यांना आयएएस बनवण्याची प्रेरणा दिली. आरती डोगरा यांनी २००६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यानंतर त्या राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

SCROLL FOR NEXT