आयुष्यात आपण कितीही मोठे झालो तरीही सर्वांमध्ये स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असते. कधीकधी परिस्थिती किंवा इतर अनेक कारणांमुळे आपले स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु आयुष्यात आपल्याला अनेकदा दुसरी संधी मिळते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळते. अशीच संधी दीपा भाटी यांना मिळाली आहे. (Success Story)
दीपा भाटी यांनी लग्नानंतर १८ वर्षांनी, ३ मुले झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले घर, कुटुंब सांभाळून स्पर्धा परीक्षा दिली आणि त्यात यशदेखील मिळवले.
दीपा या मूळच्या नोएडातील कोंडली बांगच्या गावच्या रहिवासी. दीपा यांना उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाची पीसीएस २०२१ परीक्षा दिली आहे. त्यांनी लग्नानंतर १८ वर्षानंतर त्यांनी हा निर्णय घेतली. त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची ही जिद्द सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल. (Success Story Of Deepa Bhati)
दीपा यांचे लग्न खूप कमी वयात झाले होते. त्यांच्या मनात काहीतरी करण्याची जिद्द फार पूर्वीपासूनच होती. त्यांनी बीएडची परीक्षा दिली आणि शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला. या काळात त्यांच्या गळ्याला त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करायला सांगितले होते.जर शिक्षक बोलणार नाही तर शिकवणार कसे?अशा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे त्यांना ही नोकरी करता आली नाही.
भावाने दिला स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला
नोकरी करता येत नसल्याने दीपा भाटी या खूप अस्वस्थ झाल्या होत्या. याच काळात त्यांच्या भावाने त्यांना उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाची पीसीएस परीक्षा देण्यास सांगितले.यानंतर त्यांनी परिक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी यूपीपीएससी टॉपर्सचे व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केले.
घर आणि मुलांचा सांभाळ करुन परिक्षेची तयारी (Deepa Bhati Inspiration Story)
दीपा यांच्यासाठी हा प्रवास खूप अवघड होता. मुलांचा सांभाळ करुन परिक्षेची तयारी करणे हे खूप अवघड होते. त्या काळात लोकांनी त्यांना खूप टोमणेदेखील मारले परंतु त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
दीपा भाटी यांना उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग परिक्षेत दोन वेळा असफलता मिळाली. परंतु त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात २०२१ मध्ये १६६ रँक मिळून खूप चांगले यश मिळवले. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.