अंकुश चौधरी हा मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कलाकार आहे. अंकुशची बायको दीपा परब चौधरी देखील उत्तम अभिनेत्री आहे.
अंकुश आणि दीपा यांची लव्हस्टोरीदेखील खूपच हटके आहे. त्यांनी १० वर्षे एकमेकांना डेट केले. परंतु याबाबत कोणालाही माहित नव्हतं.
अंकुश आणि दीपा या दोघांचेही शिक्षण एम.डी कॉलेजमध्ये झाले. दोघेही एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते. दोघांची नाटक, अभिनयाची आवडदेखील सारखीच होती.
रंगभूमीवर एकत्र काम करताना त्या दोघांमध्ये कधी प्रेम झाले हे त्यांनाच कळले नाही.
अंकुशने दीपाला एकदम फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. परेल ब्रिजजवळून दीपा जात होती. तेव्हा अंकुशने दीपाचा पाठलाग गेला.
परळच्या ब्रिजवर खूप गर्दी होती. भर गर्दीत त्याने गुडघ्यावर बसून गुलाबाचे फूल देत दीपाला मागणी घातली होती.
त्यांनी एकमेकांना १० वर्षे डेट केल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांना प्रिन्स नावाचा लहान मुलगा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.