Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: बिश्नोई समाजाच्या पहिल्या IAS अधिकारी; तिसऱ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; परी बिश्नोई यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story IAS Pari Bishnoi: परी बिश्नोई या बिश्नोई समाजाच्या पहिल्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक करुन इतिहास रचला आहे.

Siddhi Hande

अनेकांचे आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. प्रत्येक व्यक्तीला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतात. परंतु या अडचणींवर आपण मात करायची असते. परिस्थितीवर अशीच मात परी बिश्नोई यांनी केली आहे. परी बिश्नोई या बिश्नोई समाजाच्या पहिल्या आयएएस अधिकारी आहेत.

परी बिश्नोई यांना मूळच्या राजस्थानच्या अजमेरच्या रहिवासी. त्यांनी फक्त २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी खूप मेहनतीने अभ्यास केला. परिणामी त्यांना त्या प्रयत्नांचे यश मिळाले. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करुन नवीन इतिहास रचला आहे. (IAS Success Story)

परी बिश्नोई यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९९६ रोजी झाला. त्यांचे वडील मनीराम बिश्नोई हे वकील आहेत तर आई सुशीला बिश्नोई पोलिस अधिकारी आहेत. त्यांच्या मुलीने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णदेखील केले. त्यांना दोन वेळा अपयश आले परंतु त्यांनी तरीही हार मानली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. त्यानंतर त्यांना यश मिळाले.

परी यांना सुरुवातीला अपयश मिळाले. परंतु त्यांनी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत केली. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक ३० प्राप्त केली. त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

परी यांनी आपले शालेय शिक्षण अजमेरच्या सेंट मेरीज कॉन्वेंट स्कूलमधून केले. परी या १२वीत असतानाच त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे ठरवले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशनदेखील पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी अभ्यास केला. परी बिश्नोई यांनी २०१९ मध्ये यूपीएससी क्रॅक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT