Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: घराला छत नाही, सकाळी ६ ते २ मजुरी, रात्रभर अभ्यास; खडतर परिस्थितीत सरफराजने क्रॅक केली NEET; आता होणार डॉक्टर

Success Story Of Labourer Crack Neet: कितीही खडतर परिस्थिती असतानाही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो व्यक्ती मेहनत करतो तो यशस्वी होतो. असंच यश मजुरी करुन शिक्षण पूर्ण करणाऱ्या सरफराजला मिळालं आहे.

Siddhi Hande

कितीही खडतर परिस्थिती असली तरीही जो व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो त्याला नक्कीच यश मिळते. असंच यश एका मजुर कामगाराच्या मुलाला मिळालं आहे. पश्चिम बंगालमधून एका मुलाने दिवसा काम अन् नंतर अभ्यास करुन नीट परीक्षा क्रॅक केली आहे. २१ वर्षीय मुलाच्या या कामगिरीने सर्वांनाच प्रेरणा मिळेल.

पश्चिम बंगालच्या या मुलाने नीट परीक्षा क्रॅक केली. त्याला परिक्षेत ७२० पैकी ६७७ गुण मिळाले आहे. सरफराज असं या मुलाचे नाव आहे.सरफराजने स्वतःदेखील मजुरी केली आहे. (Success Story)

सरफराज हा दररोज सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत वीट उचलायचे काम करायचा. रोज तो ४०० वीट उचलून न्यायचा. त्याच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्याने हे काम केले.

Physics Wallah या सोशल मिडिया हँडलवरुन सरफराजचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सरफराज आणि त्याचे कुटुंब पीएम आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरात राहतात. त्यांच्या घराला छतदेखील नाही आहे. थंडीत तर ते रात्र रात्र बसून काढतात. (Success Story Of Labourer Crack NEET)

सरफराजचे एनडीएची परीक्षा देण्याचे स्वप्न होते. परंतु एका अपघातामुळे त्याला NDA ची मुलाखत देता आली नाही. त्याने सर्व अडचणींवर मात करत NDA ची परीक्षा दिली. परंतु नशिबाने साथ दिली नाही. त्याने त्याच्या शिक्षकांकडून फोन घेत युट्यूबवरुन व्हिडिओ पाहून शिक्षण पूर्ण केले आहे.

कोरोना काळात त्याने एक फोन विकत घेतला. या फोनवरुन तो नीटच्या अभ्यासाचे व्हिडिओ बघायचा. त्याने या व्हिडिओमधून शिकून अभ्यास केला. सरफराजला डेंटल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाले होते. परंतु तेथे वसतिगृह नसल्याने आणि पुरेसे पैसे नसल्याने त्याने तिथे अॅडमिशन घेतले नाही. त्याने पुन्हा २०२४ मध्ये नीट क्लिअर केली आणि कोलकत्तामधील नील रतन सिरकार मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT