प्रत्येकाची आयुष्यात काहीना काही स्वप्ने असतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिक कठोर परिश्रम करत असतो. प्रत्येक स्वप्नाला यश मिळावा असं प्रत्येकाला वाटत असत. कधी कधी स्वप्नं पूर्ण करताना आपल्या वाट्याला अपयश देखील येत असतं. पण अनेक संकटावर मात करुन काही नागरिक यशाच्या शिखरावर नक्कीच पोहचतो. असच एक यश तरुणा कमल यांनी मिळवलं आहे. तरुणा कमल या सरकारी नोकरी सोडून IPS अधिकारी झाल्या आहेत. जाणून घेऊया तरुणा कमल यांच्या यशाचा संपूर्ण प्रवास.
आपल्या भारतात अनेक नागरिक लाखो स्पर्धा परीक्षा देत असतात. UPSC आणि वैद्यकीय परिक्षा खूप कठिण असते. या कठिण परीक्षेमध्ये पास होण्यासाठी नागरिक दिवस- रात्र मेहनत देखील करत असतात. याबरोबर दोन्ही परिक्षा खूप कठिण असल्याने या परीक्षेत सहजपणे कोणाला यश मिळत नाही. पण काहीजण त्यांच्या हुशारी आणि जिद्दीने ही परीक्षा उत्तीर्ण करतात. हे सर्व काही आपण आपल्या मनाच्या जिद्दीमुळे आणि इच्छिशक्तीमुळे करु शकतो. अशीच एक यशोगाथा तरुणा कमल यांची आहे.
तरुणा कमल या हिमालय प्रदेशातील मंडी जिल्ह्यात राहणाऱ्या रहिवासी आहेत. याबरोबर त्यांनी मॅार्डन पब्लिक स्कूल मध्ये आपले बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी पालमपूर येथून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तरुणा यांचे वडील महापालिकेत एक सफाई कामगार म्हणून काम करायचे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना त्यांच्या मनात UPSC परीक्षा देण्याचा विचार आला. याबरोबर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन तरुणा डॅाक्टर देखील झाल्या होत्या. त्यांनी डॅाक्टर क्षेत्रात करिअर करायचे सोडून UPSC परिक्षा देण्याचे ठरवले. याबरोबर त्यांनी UPSC परिक्षा देण्याची तयारी सुरु केली.
तरणा कमल या आधीपासूनच खूप हुशार असल्याने त्यांनी UPSC परीक्षेचा जोरदार अभ्यास सुरु केला. याबरोबर परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी चंदीगढमधील कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. खूप मेहनत घेऊन तरुणा कमल यांनी UPSC परीक्षा पहिल्या प्रयत्नात यशस्वीरित्या पार केली. UPSC ची परीक्षा देताना तरुणा कमल यांचे वय २५ होते. तरुणा कमल आज त्यांच्या उत्तम यशामुळे IPS अधिकारी बनल्या आहेत.