Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आधी डॉक्टर, मग IPS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IPS अर्पित जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Arpit Jain: आयपीएस अर्पित जैन यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी डॉक्टर झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

IPS अर्पित जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

डॉक्टर झाल्यानंर दिली UPSC

दोनदा क्रॅक केली क्रेंदीय लोकसेवा आयोगाची परीक्षा

यशस्वी होण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे मेहनत. तुम्ही मेहनत घेतल्यावर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. यासाठी फक्त इच्छाशक्ती असायला हवी. असंत काहीसं अर्पित जैन यांनी केले. त्यांनी सुरुवातीला मेडिकलचे शिक्षण घेतले त्यानंतर यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अर्पित जैन हे नेहमीच चर्चेत असतात. ते सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय असतात.

अर्पित जैन हे मूळचे मध्य प्रदेशमधील मक्सी गावचे रहिवासी. त्यांच्या मते शिक्षण आणि तुमचा उद्देश तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. त्यांच्या घरात शिक्षणाला खूप महत्त्व होते. परंतु शिक्षणासाठीची साधने खूप कमी होती. परंतु तरीही त्यांनी याचा अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.

डॉक्टर सोडून प्रशासकीय सेवेत रुजू

आठवीनंतर ते आपल्या नातेवाईकांच्या घरी भोपाळला गेले. तिथे त्यांनी अभ्यास सुरु ठेवला. घरापासून लांब गेल्यावर स्वतः च्या पायावर उभं राहून सर्व कामे करण्याचा त्यांचा पहिल अनुभव होता. हाच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.

अर्पित जैन यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले. यानंतर एमडीचे शिक्षण पूर्ण केले. डॉक्टरचे शिक्षण पूर्ण करताना त्यांना देशात अनेक समस्या असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.

दोनदा पास केली UPSC

अर्पित जैन यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. २०१४ मध्ये त्यांना १९४ रँक प्राप्त झाली. यावेळी त्यांची आयपीएस पदावर निवड झाली. त्यांच्या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makar Sankranti Decoration Ideas: कमी खर्चात करा हटके डेकोरेशन, यंदा मकरसंक्रांतीला सजवा तुमचं घर

Maharashtra Live News Update: घड्याळाला मतदान करा म्हणत अजित पवारांचा शिवसैनिकांना सॅल्यूट

Skin Hair Care: थंडीत त्वचा कोरडी आणि केस निस्तेज झालेत? मग, वापरून पाहा 'हा' सोपा घरगुती उपाय

Budh Gochar: आजपासून चमकणार या राशींचं भाग्य; 10 वर्षांनंतर बुध करणार शुक्राच्या राशीत प्रवेश

Couple Tragedy : बायको ५ महिन्यांची प्रेग्नेंट, नवरा हनिमूनला घेऊन गेला, रोमान्स करताना रक्तस्त्राव झाला अन्...

SCROLL FOR NEXT