Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: शिक्षणासाठी घरापासून लांब राहिली, एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS नम्रता जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Namrata Jain: आयएएस नम्रता जैन यांनी एकदा नाही तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते तरीही त्यांनी हार मानली नाही.

Siddhi Hande

IAS नम्रता जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

कठीण परिस्थितीत दिली UPSC परीक्षा

पहिल्या प्रयत्नात अपयश

दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस अधिकारी अन् तिसऱ्या प्रयत्नात IAS

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. ही परीक्षा देऊन लाखो तरुणांना प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचं असतं. मात्र, अनेकदा पदरात अपयश येते. कितीही अपयश आले तरीही हार मानायची नाही. परिस्थिती कितीही बिकच असली तरीही त्यावर मात करायची. त्यासाठी मेहनत करायची. असंच काहीसं आयएएस नम्रता जैन यांनीदेखील केला.

नम्रता जैना या मूळच्या छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील रहिवासी. हा परिसर नक्षलवादीग्रस्त होता. तेथे बेरोजगारी आणि इतर अनेक गोष्टींमुळे अडचणी होत्या. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी आपली मेहनत सुरु ठेवली. त्या ठिकाणी व्यवस्थित इंटरनेट सेवादेखील नव्हती. तरीही त्यांनी आपले आणि कुटुंबाचे नाव मोठे केले. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या आईने त्यांची खूप साथ दिली. त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.

IAS नम्रता जैन यांचे शिक्षण

आयएएस नम्रता जैन यांनी सुरुवातीचे शिक्षण कारली येथील निर्मल निकेतन शाळेतून घेतले. त्यांना १०वीची परीक्षा पास करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. त्यानंतर त्यांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागले. यासाठी घरातून विरोध होता. परंतु त्यांच्या आईने कुटुंबातील इतर सदस्यांना तयार केले. १२वीची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी भिलाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून बीटेक पूर्ण केले.

नम्रता या आठवीत होत्या. तेव्हा एका कार्यक्रमात कलेक्टर भाषण करत होत्या. तेव्हा त्यांच्या वडिलांनी आयएएस ऑफिसरच्या कामाबद्दल त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे ठरवले. परीक्षेच्या आधी सहा महिने त्यांच्या दोन काकांचे निधन झाले. यामुळे त्या खूप खचल्या होत्या. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नम्रता यांनी खूप मेहनत घेतली.

पहिल्या प्रयत्नात अपयश, दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक

नम्रता यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली. त्यात त्यांना अपयश मिळाले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना ९९ रँक मिळाली आणि त्या आयपीएस अधिकारी झाल्या. परंतु त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यांनी पुन्हा २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. यात त्यांना १२वी रँक प्राप्त झाली आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Usain Bolt : जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टला आता एक पाऊलही टाकणं जड जातंय,ऑलिम्पियन दिग्गज म्हणाला...

Crime: पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे दिले नाही, संतापलेल्या तरुणाने बापाला जागीच संपवलं; लातूर हादरले

GK: भारतातील 'असं' एकमेव राज्य जिथे आजपर्यंत रेल्वे सेवा पोहोचलेली नाही, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बापाची मुलाने केली हत्या, पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

Jolly LLB 3 : 'जॉली एलएलबी 3'साठी अक्षय कुमारनं घेतले तगडं मानधन, इतर स्टारकास्टला किती मिळाले?

SCROLL FOR NEXT