

IPS स्वीटी सहरावत यांचा प्रेरणादायी प्रवास
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC
पहिल्याच प्रयत्नात झाल्या आयपीएस अधिकारी
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही सर्वात अवघड असते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही जर खूप मन लावून अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षा देतात परंतु फक्त काहीजणांना यश मिळते. परंतु आपले प्रयत्न सुरु ठेवायचे. असंच काहीसं आयपीएस स्वीटी सहरावत यांच्यासोबत झालं.
आयपीएस स्वीटी सहरावत यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससी परीक्षा दिली आणि ती पासदेखील केली. आयपीएस स्वीटी यांनी इंजिनियरिंगची नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि त्यांना यशदेखील मिळाले. त्या एक ईमानदार, निर्भीड आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
इंजिनियरिंगची नोकरी सोडली
आयपीएस स्वीटी सहरावत यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे बालपण दिल्लीतील रमजानपुर या गावात गेले. त्यांनी आपले सुरुवातीचे शालेय शिक्षण हरियाणा येथील सोनीपत येथून घेतले. यानंतर आयआयटी दिल्लीतून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये बीटेक पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी डिझाइन इंजिनियर म्हणून नोकरी केली.
वडिलांच्या स्वप्नासाठी UPSC केली क्रॅक
२०१३ मध्ये त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्यांचे वडील दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. यामुळे स्वीटी या पूर्णपणे खचल्या होत्या. परंतु त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की लेकीने यूपीएससी परीक्षा क्रॅक करावी आणि मोठ्या पदावर काम करावे.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वीटी यांनी डिझाइन इंजिनियर पदाची नोकरी सोडली. त्यांनी २०१९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी १८७ रँक प्राप्त केली. त्यानंतर त्यांची आयपीएस पदावर नियुक्ती झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.