Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सहावीत फेल; हार नाही मानली; कोणत्याही कोचिंग क्लासेसशविाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS रुक्मिणी रियार यांचा प्रवास

Success Story Of Rukmani Riar: रुक्मिणी रियार यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्या सहावीत असताना फेल झाल्या होत्या. तरीही त्यांनी हार मानली नाही.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा आपल्याला कमी लेखले जाते किंवा एखाद्या वेळेला अपयश आले तर आपण त्या स्वप्नांचा पाठलाग सोडण्याचा विचार करतो. परंतु कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करतो त्याला नक्कीच यश मिळते. असंच यश रुक्मिणी रियार (IAS Rukmani Riar) यांना मिळालं.

रुक्मिणी रियार यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहेत. त्यांनी कधीही शिक्षण सोडले नाही. त्या नेहमी अभ्यास करायच्या. रुक्मिणी या सहावीत असताना नापास झाल्या होत्या. परंतु त्या खचल्या नाही. त्यांनी प्रयत्न केले.

रुक्मिणी रियार या सहावीत फेल झाल्या होत्या. परंतु त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

रुक्मिणी यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण गुरदासपुमध्ये सेक्रेड हॉर्ट स्कूलमधून केले. त्यानंतर त्यांनी अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठातून सामाजिक विज्ञानमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

रुक्मिणी यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटमधून मास्टर्स डिग्री प्राप्त केली. यानंतर त्या मुंबईतील एका एनजीओमध्ये इंटर्नशिप करत होत्या. इंटर्नशिप करत असताना त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला.

रुक्मिणी यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नान दुसरी रँक प्राप्त केली आहे. कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय त्यांनी हे यश मिळवलं आहे.

सहावीत असताना अपयश मिळाले परंतु त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला नाही. त्यांनी नेहमी प्रयत्न केले. कधीही हार मानली नाही. प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न मनात ठेवून त्यांनी तयारी केली. त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि त्यांनी यूपीएससी क्रॅक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT