Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जोडीदार असावा तर असा! बॉयफ्रेंडच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पास; DSP दिव्या झरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of DSP Divya Jhariya: दिव्या झरिया यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. त्यांच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने त्यांनी स्पर्धा परीक्षा पास केली. त्या डीएसपी पदावर कार्यरत आहेत.

Siddhi Hande

डीएसपी दिव्या झरिया यांचा प्रवास

बॉयफ्रेंडच्या मदतीने दिली MPPSC

दुसऱ्या प्रयत्नात मिळवले यश

इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट शक्य करु शकतात. मेहनत आणि कुटुंबाच्या सपोर्टशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीने जर आपल्याला साथ दिली तर नक्कीच यश मिळते. असंच काहीसं दिव्या झरिया यांच्यासोबत झालं. त्यांनी त्यांच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पास केली. त्यांचं एकमेकांसी लग्नदेखील झालं आहे.

जोडीदाराने दिली साथ

आपल्या जोडीदाराने आपल्याला प्रत्येक प्रसंगात साथ द्यायला हवी, असं प्रत्येकाला वाटते. अशीच साथ दिव्या झरिया आणि त्यांचे पती आदित्य तिवारी यांनी एकमेकांना दिली. दिव्या यांना दोनदा यूपीएससी पीएसीएस परीक्षा पास केली. परंतु त्यांचा हा प्रवास खूप खडतर होता.

दिव्या यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले होते. त्यामुळे त्या खचल्या होत्या. परंतु अशा परिस्थितीत त्यांच्या बॉयफ्रेंडने त्यांची साथ दिली. त्यांनी शेवटी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. त्या सध्या डीएसपी म्हणून काम करतात.

दिव्या यांचे शिक्षण

दिव्या झरिया या मूळच्या मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. त्यांनी शालेय शिक्षण तिथूनच केले. यानंतर १२वीनंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग केले. इंजिनियरिंग केल्यानंतर त्यांना नोकरी मिळाली. परंतु त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी सरकारी नोकरी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी तयारी सुरु केली.

दिव्या या परीक्षेच्या तयारीसाठी इंदोरला गेल्या होत्या. त्यांनी पहिल्यांदा मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यावेळी त्यांना मेन्स परीक्षा देणे शक्य झाले नाही. परंतु त्यांनी पुढच्या वेळी खूप मेहनत घेतली. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

२०१९ मध्ये दिव्या यांनी परीक्षा पास केली. त्यांची निवड कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी झाली. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या बॉयफ्रेंडने खूप साथ दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT