MPSC Exams : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तारीख जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

MPSC : पूरस्थिती, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सप्टेंबर महिन्यातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या परीक्षांचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले आहे.
MPSC Exams
MPSC Examsx
Published On
Summary
  • राज्यभरात सप्टेंबर महिन्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

  • यामुळे सप्टेंबर महिन्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

  • पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : सप्टेंबर २०२५ महिन्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पूरस्थिती आणि अतिवृष्टी अशा गंभीर समस्या उद्भवल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज्य सरकारने देखील आयोगाकडे निवेदन केले. हे निवेदन आयोगाने स्वीकारले.

आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

संयुक्त गट ब २१ डिसेंबर २०२५

जा. क्र. ०१२/२०२५, जा. क्र. ११७/२०२५ आणि जा. क्र. १२४/२०२५ - परीक्षांच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

  • - महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५, रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.

  • - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५, रविवार, दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.

  • - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, रविवार, दिनांक ०४ जानेवारी, २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.

MPSC Exams
गौतमी पाटील कारवाईच्या कचाट्यातून 'निसटली'! १०० पेक्षा जास्त CCTV चेक केले, शेवटी पोलिसांना नेमका क्लू मिळाला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा या राज्यातील पावसामुळे, पूर परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे आता नवे वेळापत्रक आयोगाने प्रसिद्ध केले आहे. परीक्षांच्या दिनाकांबाबत प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती समोर आली आहे.

MPSC Exams
Cricketer Death : पहिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या महान क्रिकेटपटूचे निधन

आगोयाच्या परीक्षेद्वारे राज्य सरकारच्या विविध भागांमधील एकूण ३८० पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत. राज्यात मागच्या महिन्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. असंख्य विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अवघड झाले होते. यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती.

MPSC Exams
मोबाइल फोन ते मतदार ओळखपत्र...निवडणूक प्रक्रियेत तब्बल १७ बदल, निवडणूक आयोगानं यादीच जाहीर केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com