बिझनेस

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

Stop Weak Passwords: भारतामध्ये ७६ हजारांहून अधिक लोक '१२३४५६' हा पासवर्ड वापरतात, जो जगातही सर्वात सामान्य आहे. सुमारे ३० लाखांहून अधिक वापरकर्ते हा पासवर्ड वापरतात, बऱ्याच वेळा समान पासवर्ड वापरला जातो.

Dhanshri Shintre

  • सोपा आणि सामान्य पासवर्ड '१२३४५६' वापरणे खूप धोका निर्माण करते.

  • हॅकर्स काही सेकंदांत असा पासवर्ड क्रॅक करू शकतात.

  • सुरक्षिततेसाठी मजबूत आणि विशेष अक्षरे, संख्या वापरलेला पासवर्ड आवश्यक आहे.

  • पासवर्ड वेगळ्या ठिकाणी वेगळा ठेवणे आणि दोन टप्प्यांची पडताळणी वापरणे गरजेचे आहे.

सहसा जेव्हा आपण पासवर्ड सेट करतो तेव्हा सहज लक्षात ठेवता येईल असा नंबर किंवा नाव वापरतो. कधी कधी घाईत असल्यामुळे लोक लगेच १ ते ६ पर्यंत मोजणी करत असतात आणि तोच क्रमांक पासवर्ड म्हणून निवडतात. अलीकडे अनेक वेबसाइट्स आणि अॅप्स वापरकर्त्यांना सुरक्षिततेसाठी अधिक मजबूत पासवर्ड तयार करण्याचे सूचवित आहेत. यामध्ये विशेष अक्षरे, संख्या आणि चिन्हांचा समावेश करावा लागतो, ज्यामुळे पासवर्ड हॅक होण्याचा धोका कमी होतो. तरीही, अनेक लोक घाईत किंवा सुलभतेसाठी अशा पासवर्डचा वापर करतात जे फक्त काही सेकंदांत हॅकर्स सहज तोडू शकतात.

गेल्या वर्षी नॉर्डपासने ४४ देशांमध्ये आणि भारतात वापरल्या जाणाऱ्या टॉप २०० सर्वाधिक सामान्य पासवर्ड्सचा अभ्यास प्रसिद्ध केला. या संशोधनानुसार, '१२३४५६' हा पासवर्ड जगभरातील सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड आहे. एकूण ३० लाखांहून अधिक वापरकर्ते हा पासवर्ड वापरतात, तर भारतातही हा पासवर्ड सर्वाधिक लोकप्रिय असून ७६,९८१ लोक वापरतात. हॅकर्ससाठी हा पासवर्ड सहज आणि जलद तोडणे शक्य आहे, कारण ते फक्त काही सेकंदांत तो क्रॅक करू शकतात.

दुसऱ्या क्रमांकावर जगात सर्वात सामान्य पासवर्ड म्हणून '१२३४५६७८९' आहे, जो भारतात चौथ्या क्रमांकावर आहे. नॉर्डस्टेलरच्या संशोधनानुसार, अनेक लोक 'qwerty', '1q2w3e4r5t' सारखे सोपे पासवर्ड देखील वापरतात. लोकांना अनेक वेबसाईट्स आणि अॅप्सवर लॉगिन करावे लागते, ज्यामुळे त्यांना अनेक वेगळे पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण जाते, त्यामुळे ते समान पासवर्ड अनेक ठिकाणी वापरतात.

भारताच्या दृष्टीने पाहिले तर सर्वात सामान्य पाच पासवर्ड आहेत – '१२३४५६', 'पासवर्ड', '१२३४५६७८', '१२३४५६७८९' आणि 'abcd१२३४'. तर अमेरिकेत 'सीक्रेट' हा सर्वात जास्त वापरला जाणारा पासवर्ड आहे, त्यानंतर '१२३४५६', 'पासवर्ड', 'क्वर्टी१२३' आणि 'क्वर्टी१' यांचा क्रम आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक मजबूत आणि वेगळ्या प्रकारचे पासवर्ड वापरणे गरजेचे आहे.

हा पासवर्ड का टाळावा?

हा पासवर्ड अत्यंत सोपा आहे आणि हॅकर्स त्याला फक्त काही सेकंदांत क्रॅक करू शकतात, त्यामुळे तुमची माहिती धोकेत येऊ शकते.

मजबूत पासवर्ड कसा तयार करावा?

मजबूत पासवर्डमध्ये अक्षरे, संख्या आणि विशेष चिन्हांचा वापर करा, आणि तो सहज लक्षात राहणारा पण ओळखायला कठीण असा असावा.

समान पासवर्ड अनेक ठिकाणी वापरायचा का?

नाही, समान पासवर्ड वापरल्यास एकाच ठिकाणी तोडल्यास इतर सर्व खात्यांनाही धोका संभवतो, त्यामुळे वेगळे पासवर्ड वापरा.

पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी काय करावे?

दोन टप्प्यांची पडताळणी वापरा, नियमित पासवर्ड बदला आणि कोणासोबतही पासवर्ड शेअर करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावर चाकणमध्ये वाहतुककोंडी

Saif Ali Khan: सैफ अली खानच्या १५००० कोटींच्या प्रोपर्टीबाबत मोठी अपडेट; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चर्चेत

Vivo V60: सेल्फी येईल एकदम कडक! Vivo आणणार स्टायलिश स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Pune Crime : पुण्यात महिलेनं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Pune News: ठेकेदाराच्या निष्काळजीपणानं कामगाराचा जीव घेतला; ३ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT