iPhone युजर्ससाठी धक्का! Truecaller मधील कॉल रेकॉर्डिंग फीचर होणार बंद, बॅकअपसाठी 'असा' उपाय करा

Truecaller ने आयफोन युजर्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पासून कॉल रेकॉर्डिंग फीचर बंद होणार आहे, रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक स्टेप्स जाणून घ्या.
Truecaller to discontinue call recording on iPhones from September 30
Truecaller to discontinue call recording on iPhones from September 30
Published On
Summary
  • ट्रूकॉलर ३० सप्टेंबर २०२५ पासून आयफोन युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंग फीचर बंद

  • अ‍ॅपलच्या प्रायव्हसी धोरणामुळे हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

  • युजर्सनी वेळेत त्यांच्या रेकॉर्डिंग्स iCloud मध्ये बॅकअप करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे

  • अंतिम मुदत नंतर रेकॉर्डिंग्स ट्रूकॉलर अ‍ॅपमधून कायमस्वरूपी डिलीट होतील

जगातील ट्रूकॉलर (Truecaller) व स्पॅम ब्लॉकिंग अ‍ॅप ट्रूकॉलरने आयफोन युजर्ससाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पासून ट्रूकॉलर आयफोन युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंग फीचर बंद करणार आहे. यामुळे आयफोन युजर्सना कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय वापरता येणार नाही.

ट्रूकॉलरच्या या निर्णयामागे अ‍ॅपलचे धोरण महत्त्वाचे ठरले आहे. अ‍ॅपल आता थर्ड-पार्टी अ‍ॅप्सना कॉल रेकॉर्ड करण्यासाठी परवानगी देत नसल्यामुळे, ट्रूकॉलरला कॉल रेकॉर्डिंगसाठी अतिरिक्त तांत्रिक पद्धती वापराव्या लागत होत्या. यामुळे प्रक्रियेत गुंतागुंत निर्माण होत होती आणि खर्चही वाढत होता. ट्रूकॉलर आयओएसचे प्रमुख नकुल काबरांनी टेकक्रंचला दिलेल्या माहितीत याचा खुलासा केला आहे.

Truecaller to discontinue call recording on iPhones from September 30
Instagram Live Update: इन्स्टाग्राम लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी नवे नियम, नव्या युजर्ससाठी मोठा फटका

२०२३ मध्ये ट्रूकॉलरने कॉल रेकॉर्डिंग फीचर प्रथम पेड आयफोन युजर्ससाठी सुरू केले होते, त्यानंतर हे फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी देखील उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, अ‍ॅपलच्या धोरणामुळे हा फीचर बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. ट्रूकॉलरने युजर्सना वेळेत त्यांचे कॉल रेकॉर्डिंग डाउनलोड करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Truecaller to discontinue call recording on iPhones from September 30
YouTube Ban: 'या' देशात १६ वर्षांखालील मुलांवर यूट्यूब बंदी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

३० सप्टेंबरपासून कॉल रेकॉर्डिंग बंद

यासाठी ट्रूकॉलर अ‍ॅप उघडून ‘रेकॉर्ड’ टॅबवर जावे, तेथील सेटिंग्स आयकॉनवर टॅप करावे आणि ‘स्टोरेज प्रेफरन्स’ मध्ये जाऊन iCloud स्टोरेज निवडावे. ३० सप्टेंबरनंतर युजर्सची कॉल रेकॉर्डिंग्स अ‍ॅपमधून पूर्णपणे डिलीट करण्यात येणार असल्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Truecaller to discontinue call recording on iPhones from September 30
WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप चॅटमध्ये बदल होणार, वापरकर्त्यांना 'हे' नवीन अपडेट मिळणार

ट्विटरवर अनेक युजर्सनी Truecaller कडून आलेल्या नोटिफिकेशनचे स्क्रीनशॉट शेअर करत या बदलावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, आयफोनवरील कॉल रेकॉर्डिंग सुविधा ३० सप्टेंबरपासून उपलब्ध राहणार नाही आणि रेकॉर्डिंग्स सेव्ह न केल्यास त्या कायमच्या डिलीट होतील. Truecaller चा हा निर्णय युजर्ससाठी धक्का असला तरी अ‍ॅपलच्या प्रायव्हसी धोरणांमुळे हे पाऊल उचलावे लागले असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com