AI Without Internet: इंटरनेट नसेल तरी लॅपटॉपवर चालणार 'AI', काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या

Artificial Intelligence: शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता इंटरनेटशिवाय थेट लॅपटॉपवर चालते. जाणून घ्या, हे AI मॉडेल कसे कार्य करते आणि काय फायदे देते.
AI Without Internet: इंटरनेट नसेल तरी लॅपटॉपवर चालणार 'AI', काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या
Published On
Summary
  • ओपनएआयने GPT-OSS-२० B हे हलके AI मॉडेल लॅपटॉपवर स्थानिक वापरासाठी लॉन्च केले आहे.

  • हे मॉडेल इंटरनेटशिवाय काम करते, ज्यामुळे वापर सोपा आणि सुरक्षित होतो.

  • GPT-OSS-१२० B हे GPU आधारित जास्त शक्तिशाली मॉडेल आहे.

  • AI चे हे मॉडेल स्पर्धा परीक्षा, आरोग्यसेवा आणि तांत्रिक क्षेत्रात उपयोगी आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये क्रांतिकारी बदल घडवित, ओपन एआयने GPT-OSS-१२० B आणि GPT-OSS-२० B हे दोन नवीन ओपन-वेट लेंग्वेज मॉडेल्स लाँच केले आहेत. या मॉडेल्सची खासियत म्हणजे त्यांना इंटरनेट किंवा क्लाऊडची गरज न पडता थेट सामान्य लॅपटॉपसारख्या डिव्हाइसवर स्थानिक पातळीवर वापरता येणार आहे, असे कंपनीने सांगितले आहे.

GPT-२ नंतर ओपन एआयने पहिलेच सार्वजनिक केलेले हे ओपन-वेट मॉडेल्स आहेत, ज्यामध्ये सर्व पॅरामीटर्स पूर्णपणे खुल्या आणि डेव्हलपर्ससाठी कस्टमायझेशनसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे डेव्हलपर्सना हवे तसे कस्टमाईज करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे. कंपनीच्या मते, या मॉडेल्सचा आकार GPT-४ सारख्या मोठ्या मॉडेल्सच्या तुलनेत हलका असला तरी कामगिरीत ते कमी नाहीत.

GPT-OSS-१२० B मॉडेल उच्च कार्यक्षम GPU सेटअपसाठी तयार करण्यात आले असून, GPT-OSS-२० B इतका हलका आहे की तो लॅपटॉप किंवा पर्सनल कॉम्प्युटरवरही सहज वापरता येतो. दोन्ही मॉडेल्सना केवळ टेक्स्ट डेटासेटवर प्रशिक्षित केले गेले असून, यात विज्ञान, गणित, तांत्रिक ज्ञान आणि कोडिंग यांसारख्या विषयांचा समावेश आहे. त्यामुळे या मॉडेल्स स्पर्धा परीक्षा, आरोग्य क्षेत्र आणि तांत्रिक प्रश्नांची उत्तरे देण्यामध्ये उत्कृष्ट ठरतात.

सध्या ओपन एआयचे बाजारमूल्य अंदाजे ३०० अब्ज डॉलर किंवा सुमारे २६,००० अब्ज रुपये आहे. ओपन एआयने अद्याप आपल्या नवीन मॉडेल्सची तुलना इतर ओपन सोर्स एआय मॉडेल्सशी केली नाही, पण कंपनीचा दावा आहे की या मॉडेल्स अनेक बाबतीत उत्कृष्ट कामगिरी करत असून भविष्यात एआयच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवण्याची क्षमता त्यामध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com