Stock Market Yandex
बिझनेस

Stock Market : शेअर बाजारात 'हिरवळ'; सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market today : शेअर बाजारात आज सोमवाारी तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारात आज सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला. तर बँकिंग स्टॉक्स चांगलेच तेजीत दिसून आले.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअरवाला सेन्सेक्सने बाजार सुरूच होताच नवा उच्चांक गाठला आहे. यामुळे सेन्सेक्सने पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने (NIFTY-50) १०० अंकांनी उसळी घेतली आहे. शेअर बाजारातील तेजीदरम्यान बँकिंग स्टॉक्समध्येही उसळी पाहायला मिळाली.

सोमवारी सकाळी ९.१५ वाजता शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान सेन्सेक्स ८१,६७९.६५ अंकावर खुला झाल्यानंतर ४०० अंकांनी उसळी घेतली. त्यानंतर सेन्सेक्स ८१,७४९.३४ अंकावर पोहोचला.

निफ्टीनेही घेतली उसळी

सेन्सेक्सप्रमाणे एनएसईच्या निफ्टीमध्येही जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. निफ्टीने १२६.७० अंकांनी उसळी घेत २४,९६१.५० अंकावर पोहोचला. शुक्रवारी निफ्टी २४,८३४ अंकावर बंद झाला होता. आज बाजार सुरु झाल्यानंतर काही मिनिटातच निफ्टी २४,९८०.४५ अंकावर पोहोचला. तर निफ्टी-५० ने नवा उच्चांकी स्तर गाठला आहे.

१० शेअरमध्ये जबरदस्त उसळी

शेअर बाजाराचा व्यवहार सुरु झाल्यानंतर जवळपास २२६४ शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. तर ४९५ शेअर ग्रीन झोनमध्ये ओपन झाले. तसेच १२७ शेअर्समध्ये कोणतेही बदल पाहायला मिळाले नाही. बातमी लिहित असताना शेअर बाजारात आयसीआयसीआय बँक(२.०४ टक्के), एल अँड टी शेअर्स (२ टक्के), एसबीआय शेअर्स (२ टक्के) या शेअर्सने तेजीत दिसले. या व्यतिरिक्त टाटा मोटोर्स, अल्ट्राट्रेक सीमेंट शेअर्सनेही १ टक्क्यांनी आघाडी घेतली.

मिडकॅप कंपन्यांमध्ये IOB शेअर (४ टक्के), बँक ऑफ इंडिया (३.७० टक्के) ऑइल इंडिया शेअर्स (३.३४ टक्के), आयडीबीआय बँक शेअर्स (२.८५ टक्के) या शेअर्सने आघाडी घेतली. तर स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये डीसीब्लू शेअर्सने १४ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. १० सर्वाधिक उसळी घेणाऱ्या शेअर्समध्ये रिलायन्स, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, इंड्सइंड बँक, बीपीसीएनच्या शेअर्सचा समावेश आहे.

नोंद - शेअर बाजाराच्या गुंतवणुकीत जोखीम असते. शेअर बाजारातील व्यवहारात फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT