भारतीय शेअर बाजाराने आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी कमबॅक केलं. सेन्सेक्समध्ये मागील ५ दिवसांपासून घसरण पाहायला मिळत होती. त्यानंतर आज सेन्सेक्सने ३४१ अंकांनी उसळी घेतली आहे. निफ्टीनेही आज उसळी दिसून आली.
निफ्टी आज २२,५०० अंकावर बंद झाला. त्यामुळे आज बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांचं बाजार मूल्य १.६५ लाख कोटींनी वाढलं. मीडकॅप शेअरमध्येही आज तेजी पाहायला मिळाली. स्मॉलकॅप इंडेक्स सपाट राहिले. तसेच फार्मा आणि मेटल शेअरमध्येही तेजी पाहायला मिळाली. बँक निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी हिरव्या रंगात दिसला. दुसरीकडे आयटी आणि एफएमसीजीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
बीएसईचा सेन्सेक्सचा ३४१.०५ अंकांनी म्हणजे ०.४६ टक्क्यांनी उसळी घेऊन ७४,१६९,९५ अंकावर बंद झाला. एनएसईचा ५० शेअर इंडेक्स, निफ्टी ११२.४५ अंक म्हणजे ०.५० टक्क्यांनी वाढून २२,५०९,६५ वर स्थिरावला.
बीएसई सेन्सेक्सच्या ३० शेअरपैकी २० शेअर आज हिरव्या रंगात दिसले. बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये ३.५९ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रा, अॅक्सिक्स बँक, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये १.६३ टक्के ते २.४१ टक्क्यापर्यंत उसळी पाहायला मिळाली.
सेन्सेक्सच्या १० शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. आयटीसीच्या शेअरमध्ये ०.९८ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. नेस्ले इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एशियन पेंटच्या शेअरमध्ये ०.५० टक्के ते ०.७६ टक्क्यापर्यंत घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये घसरणाऱ्या शेअरची संख्या अधिक होती. एक्सचेंजवर आज एकूण ४,२३९ शेअरचा व्यवहार दिसला. त्यात १,६०९ शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर २,५०२ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.