Reliance Share : लॉटरी लागली ना भाऊ..! ३०० रूपयांचे झाले ₹१२०००००; ३७ वर्षांपूर्वी घेतले होते फक्त ३० शेअर्स

Reliance Shares News: चंदीगडच्या एका माणसाने ३७ वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स विकत घेतले होते. आणि हा व्यक्ती या शेअर्सबाबत विसरुन गेला होता. आता या शेअर्सची किंमत १२ लाख रुपये आहे.
Reliance Shares
Reliance SharesSaam Tv
Published On

शेअर मार्केट हा गुंतवणूकीसाठी बेस्ट पर्याय आहे. परंतु शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची असू शकते. त्यामुळे नेहमी गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. परंतु कधीतरी शेअर मार्केटमध्ये खूप जास्त नफा होतो. म्हणजे काही वर्षांपूर्वी घेतलेल्या शेअर्सचे आपल्याला लाखो, कोट्यवधि रुपये मिळतात. असंच काहीसं चंदीगडच्या एका व्यक्तीसोबत झालं.

Reliance Shares
Success Story: कोकणात नव्हे तर सोलापुरात फुलवलीये नारळाची बाग; ६० वर्षीय आजोबांचा अनोखा प्रयोग

चंदीगडच्या एका व्यक्तीने काही वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स फक्त ३० रुपयांना विकत घेतले होते. या शेअर्सची किंमत आता लाखो रुपये झाली आहे. या व्यक्तीने एक्स या अकाउंटवर शेअर्सच्या सर्टिफिकेटचा फोटो शेअर केला आहे.

या व्यक्तीने फेब्रुवारी १९८७ आणि डिसेंबर १९९२ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स विकत घेतले होते.जवळपास ३० शेअर्स त्यांनी विकत घेतले होती. याच शेअर्सची किंमत आता लाखो रुपये आहे. ३७ वर्षांपूर्वी हे शेअर्स विकत घेतले होते आणि तो व्यक्ती विसरुन गेला. अचानक त्याला या शेअर्सचं सर्टिफिकेट सापडलं. या शेअर्सची किंमत आता लाखो रुपये आहे.

ज्या व्यक्तीने हे शेअर्स विकत घेतले होते तो एक रॅली ड्रायव्हर आहे. त्यांना या स्टॉक मार्केटबद्दल काहीच माहित नाही.कोणी मला या शेअर्सबद्दल माहिती देईल का?, असं त्याने एक्स प्लॅटफॉर्मवर लिहले आहे. याचसोबत रिलायन्स ग्रुपला टॅगदेखील केले आहे.

Reliance Shares
Share Market Today : सलग नवव्या दिवशी शेअर बाजार घायाळ; गुंतवणूकदारांचे ३००० कोटी बुडाले, कोणते शेअर ठरले टॉप लुझर्स?

या पोस्टवर एका व्यक्तीने रिप्लाय दिला आहे की, हे तीस शेअर्स सध्याच्या ९६० शेअर्सइतके आहे. या शेअर्सची किंमत सध्या तरी १२ लाख रुपये आहे.या व्यक्तीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याचसोबत अनेकांनी हे पैसे गुंतवणूक करा, असाही सल्ला दिला आहे.

Reliance Shares
Share Marekt Today : शेअर बाजारात आपटीबार सुरुच; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये ऐतिहासिक घसरण, कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com