
भारतीय शेअर बाजारात बुधवारी म्हणजे १२ मार्च रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स उच्चांकी स्तर ७९३.९९ अंकांनी घसरून ७३,५९८.१६ या निचांकी स्तरावर पोहोचला. निफ्टी २४७.८५ अंकांनी घसरून २२,३२९ स्तरावर पोहोचला. आज आयटी शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. इन्फोन्सिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या टॉप लुझर्स शेअर्सचा समावेश झाला आहे.
ग्लोबल शेअर मार्केटवर ट्रेड वॉरच्या शक्यतेता परिणाम पाहायला मिळत आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावरून येणारे स्टील आणि अॅल्यूमिनियमवर आयातशुल्क वाढवण्याचे संकेत दिले आहेत. याआधी आयातशुल्क ५० टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता पुन्हा एकदा त्यावर विचार करण्यास सुरुवात केली आहे.
गुंतवणूकदार भारत आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आकड्याशी आकड्यांची प्रतीक्षा करत आहे. यामुळे बाजारातील गुंतवणूकदार अलर्ट झाले आहेत. विदेश संस्थात्मक गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात ४,१७,२१६ कोटींची विक्री केली आहे. या गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव वाढू लागल्याचे एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२५ साली मंदी येण्याची शक्यता नाकारली आहे. 'या बदलत्या काळात आम्ही जे करतोय, ते मोठं आहे. आम्ही अमेरिकेत पैसा आणत आहोत. यासाठी थोडा वेळ लागत आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
मार्केट एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की,धोरणात बदल केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जागतिक बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे'.
मीडिया रिपोर्टनुसार, आज बीएसईचे टॉप ३० शेअरपैकी इंडसलंड बँक, टाटा मोटार्स, कोटक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक, आयटीसी शेअर्स टॉप गेनर्स ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.