Stock Market Fell After Budget Saam Tv
बिझनेस

Share Market : बजेटनंतर शेअर बाजाराची घसरगुंडी! सेन्सेक्स, निफ्टी आपटला! VIDEO

Stock Market Fell After Budget 2024: बजेटनंतर शेअर मार्केट कोसळल्याचं समोर आलंय. सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय आहे, ते पाहू या.

Rohini Gudaghe

मुंबई: अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान शेअर बाजार सावरला नाही. तर बजेटनंतर शेअर मार्केट कोसळलं आहे. सेन्सेक्स सुमारे ५०० अंकांनी घसरताना दिसत आहे. तर निफ्टी जवळपास १५० अंकांनी घसरला आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर केलाय.

केंद्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर (Budget 2024) अखेर आज अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सर्वसामान्यांसह शेअर बाजारालाही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये निराशेचं वातावरण आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये वारं फिरलंय.

मोदी सरकारचं बजेट सादर होताच, शेअर बाजार वेगात खाली आलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर शेअर बाजारात मोठा भूकंप झालाय. सेन्सेक्स १२३७ अंकांनी घसरून ७९२६४ अंकांवर आलाय. एकेकाळी तो७९२२४ पर्यंत घसरला होता. त्याचवेळी निफ्टी ४०९ अंकांनी घसरला (Stock Market Fell After Budget 2024) आहे. आता ते २४०९९ अंकांवर आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे शेअर बाजार मोठी उलथापालथ झाली आहे.

सध्या सेन्सेक्य ७९,२२४ अंकांवर तर निफ्टी २४०९९ वर (Share Market) आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरूवातीला शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात बाजार वेगात खाली आलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू (Sensex Nifty) असताना, शेअर बाजाराने वेग पकडला होता. परंतु त्यानंतर मात्र मोठी घसरण झाल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT