share market news update Saam tv
बिझनेस

गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

share market news update : गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळलाय. गुंतवणूकदारांचा ११.५ लाख कोटींचा चुराडा झालाय. २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

Vishal Gangurde

गुडी पाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात घसरण

सेन्सेक्स २,४९६ अंकांनी तर निफ्टी ७७५ अंकांनी घसरला

गुंतवणूकदारांचे सुमारे ११.५ लाख कोटींचे नुकसान झालंय

Share Market Crash : गुढीवाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळलं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी एक दिवसांत ३ टक्क्यांहून अधिक अंकांनी घसरलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कडाडल्याने शेअर बाजारातही भीती पसरल्याचे दिसत आहे.

शेअर बाजारात आज गुरुवारी दिवसाअखेर सेन्सेक्स २,४९६.८९ अंकांनी कोसळून ७४,२०७.२४ वर बंद झाला. तर निफ्टी ७७५.६५ अंकांनी घसरून २३,००२.१५ अंकावर स्थिरावला. निफ्टी बँक इंडेक्स जवळजवळ २००० अंकांनी घसरला. मागील २१ महिन्यात म्हणजे जून २०२४ निफ्टी ५० मध्ये सर्वाधिक अंकांनी घसरला आहे.

बाजारात चौफेर पझझड पाहायला मिळत आहे. निफ्टीचे १६ सेक्टोरल इंडेक्स लाल रंगात दिसत आहे. बँक आणि फायन्शिअल क्षेत्राशी निगडीत शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. या शेअरमध्ये ३ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. यात HDFC बँकेचे शेअर अधिक प्रमाणात घसरल्याचे सांगण्यात येत आहे. मीडकॅप, स्मॉलकॅप शेअरमध्येही घसरण सुरू आहे. निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० इंडेक्स २-२ टक्क्यांनी घसरले आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने बाजारात पडझड झाल्याचे सांगण्यात येत आहे. कच्च्या तेलाचा दर सध्या १२० डॉलर प्रति बॅरलवर पोचला आहे. पश्चिम आशियामध्ये एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर होणाऱ्या हल्ल्यामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यांत अडचणी येऊ लागल्या आहेत. यामुळे तेलाच्या किंमती उसळल्या आहेत.

सेन्सेक्सचे ३० पैकी ३० शेअर घसरले आहेत. इटरनलचा शेअर ५.६५ टक्क्यांनी घसरला. बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रोच्या शेअरमध्ये ४.७२ टक्क्यांपासून ५.४२ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT