

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालीये
सोन्याचा दर 3,000 रुपयांपेक्षा जास्त कमी झालाय
चांदीच्या दरात 13,000 रुपयांची घसरण
सोने-चांदीच्या दरात गुरुवारी मोठी घसरण झाली आहे. सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने गुढीपाडव्याच्या दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याचा दर आज गुरुवारी १५१,६२७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. त्यामुळे मागील दिवसाच्या तुलनेत सोन्याचा भाव आज गुरूवारी ३ हजार रुपयांनी कोसळला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव बुधवारी १,५४,८७९ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. एकंदरित आज गुरुवारी सोन्याचा भाव ३२४२ रुपयांनी कोसळला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव आज गुरुवारी १५१०३० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. त्यामुळे २२ कॅरेट सोन्याचा भावात ३,२२९ रुपयांनी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत बुधवारी ही १,५४,२५९ रुपये इतकी होती.
18 कॅरेट सोन्याची किंमत गुरूवारी १३८८९९ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी होती. याआधी १८ कॅरेट सोन्याची किंमत १,४१८६९ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी होती. bullions.co.in च्या किंमतीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर ४३५० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे आज गुरुवारी सोन्याचा भाव १४९,४५० रुपये इतका आहे.
आयबीजेएच्या माहितीनुसार, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. बाजारात आज गुरुवारी १ किलो चांदीचा भाव २,३६,८०९ रुपये इतका आहे. तर बुधवारी १ किलो चांदीचा भाव २,४९,९०७ रुपये इतका होता. त्यामुळे आज गुरुवारी चांदीचा भाव १३,०९८ रुपयांनी घसरला आहे. bullions.co.in किंमतीनुसार, बाजारात आज गुरुवारी १ किलो चांदीचा भाव २,३५,०५० रुपये इतका आहे. त्यानुसार, आज गुरुवारी चांदीचा भाव १३,१२० रुपयांनी घसरला आहे.
सोन्याचा आजचा दर काय?
24 कॅरेट सोने: 1,51,600 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोने: 1,51,030 रुपये प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट सोने: 1,38,899 रुपये प्रति 10 ग्रॅम
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.