Share Market Opening News Today Saam Tv
बिझनेस

Share Market : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सने घेतली ५०० अंकानी उसळी, निफ्टीही उच्चांकी स्तरावर

Share Market Latest Update : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. बाजार सुरु झाल्यानंतर बॉम्बे एक्सचेंजमध्ये ३० शेअरच्या सेन्सेक्सने ५०० अंकानी उसळी घेतली.

Vishal Gangurde

Share Market Update :

आज १ एप्रिलला नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. बाजार सुरु झाल्यानंतर बॉम्बे एक्सचेंजमध्ये ३० शेअरच्या सेन्सेक्सने ५०० अंकानी उसळी घेतली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने मोठी भरारी घेतली आहे.

शेअर बाजारात एप्रिलच्या सुरुवातीपासून तेजी पाहायला मिळत आहे. सकाळी ९.१५ वाजता बीएसई सेन्सेक्सने ४४१.६५ अंक म्हणजे ०.६० टक्क्यांनी तेजी घेतली आहे. यामुळे सेन्सेक्स ७४,०९३ पातळीवर सुरु झाला आहे. त्यानंतर सेन्सेक्स ५५२.०३ अंकानी उसळी घेतली. त्यामुळे ७४,२०३.३८ पातळीवर पोहोचत ट्रेड करत आहे. मागच्या आठवड्यात सेन्सेक्स हा ७३,६५१.३५ अंकावर बंद झाला होता.

सेन्सेक्ससहित निफ्टीनेही चांगली सुरुवात केली आहे. निफ्टी १५२.५० अंक म्हणजे ०.६८ टक्क्यांनी उसळी घेत २२,४७९.४० वर सुरु झाला. त्यानंतर काही मिनिटात १८४.३० अंकानी उसळी घेत २२,५११.२० ट्रेड करत होता. तर मागच्या आठवड्यात निफ्टी २२,३२६.९० पातळीवर बंद झाला होता.

कोणते शेअर तेजीत आहे?

स्टॉक मार्केट सुरु झाल्यावर २,०४४ शेअरमध्ये वाढ होत हिरवा झेंडा मिळत व्यवहाराला सुरुवात झाली. तर ४४८ शेअरला लाल झेंडा मिळाला. निफ्टीमध्ये हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोयसिस , बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँक फायद्यात आहे. तर इंडसइंड बँक, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स तोट्यात आहे.

HDFC ते IDFC बँकिंग शेअरमध्ये तेजी

सोमवारी शेअर बाजारात बँकिंग स्टॉक्स तेजीत पाहायला मिळाले. या शेअरमध्ये १ टक्के तेजी पाहायला मिळाली. बीएसईवर एयू बँक शेअर १.९७ टक्के, HDFC शेअर १.२८ टक्के, कोटक बँक शेअर १.१९ टक्के, IDFC First Bank Share 1.07 टक्क्यांनी उसळी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेला लवकरच होणार सुरुवात

Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाला मिळाली एका दिवसाची मुदतवाढ

Maharashtra Politics : राज्यात मनसेला खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

भाजपचा माजी आमदार, तत्कालीन पोलीस अधीक्षक, ९ कॉन्स्टेबलसह १४ जणांना जन्मठेप; २०१८ मध्ये घडलेलं नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT