Mina Bindra saam tv
बिझनेस

Success Story: 8 हजारांच्या कर्जात सुरू केला बिझनेस, आज आहेत 800 कोटींच्या मालकीण, कोण आहेत मीना बिंद्रा?

Success Story: बिझनेससाठी मोठ्या गुंतवणूकीची गरज नाही. याचच एक उदाहरण म्हणजे मीना बिंद्रा. जाणून घेऊया मीना यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या प्रत्येकाला वाटतं की, छोटा का असेना आपला देखील बिझनेस असावा. मात्र नुकसान होऊ नये या भीतीने अनेकजण बिझनेसचा विचार डोक्यातून काढून टाकतात. पण बिझनेससाठी मोठ्या गुंतवणूकीची गरज नाही. आणि कोणतीही व्यक्ती बिझनेस करू शकते. याचच एक उदाहरण म्हणजे मीना बिंद्रा.

मीना बिंद्रा या गृहिणी असून त्यांना वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी त्यांच्या आवडत्या कामाचं बिझनेसमध्ये रूपांतर केलं. आज त्यांची कंपनी 'BIBA' 800 कोटींहून अधिक पैसे कमावते. मीना यांनी घरबसल्या सूट विकून बिबाची सुरुवात केली होता. तर आज बिबा हा भारतातील टॉप एथनिक कपड्यांचा ब्रँड मानला जातो. जाणून घेऊया मीना यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा.

अवघ्या २० व्या वर्षी झालं लग्न

मीना बिंद्रा यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी लग्नगाठ बांधली. एका सामान्य गृहिणीप्रमाणे त्यां त्यांचं आयुष्य जगत होत्या. यावेळी वयाच्या ४० व्या वर्षी त्यांची मुलं मोठी झाल्यावर घरबसल्या 'सिंपल कॉटन प्रिंटेड सूट्स' विकायला सुरुवात केली.

मुळात यावेळी त्याच्याकडे याचं व्यावसायिक प्रशिक्षण नव्हतं. मुंबईत राहत असताना मीना यांनी १९८३ मध्ये तिच्या भावाच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये एक प्रदर्शन भरवून त्या ठिकाणी स्वतःचे शिवलेले सूट विकले. त्यांच्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

8000 रुपयांच्या कर्जाने मीना यांचा प्रवास झाला सुरु

मीना बिंद्रा यांच्या पतीने देखील त्यांना यामध्ये मदत केली. यावेळी मीना यांनी बँकेकडून 8000 रुपयांचे कर्ज घेतलं. पहिल्यांदा मीना यांनी साधे सूट बनवले ज्यावर ब्लॉक प्रिंटिंग होते. मीनाने तिच्या गुंतवणुकीचा अर्धाही खर्च केला नव्हता. मात्र तरीही तिचे बहुतेक सूट प्रदर्शनात विकले गेले. अशा पद्धतीने त्यांचे पैसे जवळजवळ दुप्पट झाले. हळुहळू मीनाला मुंबईतील मोठ्या स्टोअर्समधून ऑर्डर मिळू लागल्या.

आज कमावतात कोट्यवधी रूपये

आपल्यापैकी अनेकांनी या बीबा ब्रँडचे कपडे वापरले असतील. 'बीबा' हा शब्द मुख्यतः पंजाबी असून हा शब्द प्रेमळ म्हणून वापरला जातो. हा सहसा मुलगी किंवा स्त्रीसाठी संबोधला जातो. बीबा ब्रँडला बॉलीवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला जेव्हा किशोर बियाणीने 'ना तुम जानो ना हम' चित्रपटात त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर ब्रँडची प्रगती सुसाट झाली. आजच्या काळात Biba चे 300 पेक्षा जास्त ब्रँड आउटलेट्स आणि 275 मल्टी-ब्रँड आउटलेट्स आहेत. त्यांचा एकूण रेव्हेन्यू ८०० कोटींहून अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT