Skoda Kushaq Onyx Google
बिझनेस

६ एअरबॅग्ज अन् जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह Skoda Kushaq Onyx भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

Skoda Kushaq Onyx: स्कोडा कंपनीने आपली नवीन कार Skoda Kushaq Onyx कार लाँच केली आहे. ही कार उत्तम सेफ्टी फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्कोडा ही देशातील चांगल्या वाहन उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. स्कोडा कंपनीने आपली नवीन कार बाजारात लाँच केली आहे. कंपनीने Skoda Kusahq Onyx बाजारात लाँच केली आहे. ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह लाँच केली आहे. या कार अॅडव्हान्स फीचर्ससह लाँच केली आहे.

स्कोडाची हा कार नवीन केबिन फिचर्स आणि जबरदस्त सेफ्टी फीचरसह लाँच झाली आहे. या कारची किंमत १३.४९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्ज दिल्या आहेत.

Skoda Kusahq Onyx मध्ये कंपनीने १.० लिटर क्षमतेचे ३ सिलेंडर टर्बो पेट्रोल TSI इंजिन वापरले आहे. हे इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह जोडले आहे. इंजिन 115Ps पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करते. ही एसयूव्ही सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात उत्कृष्ट आहे.

Skoda Kusahq Onyx ही देशातील पहिली एसयूव्ही आहे. ज्यात वृद्ध नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी जबरदस्त सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहे. ही एसयूव्ही खास भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Skoda Kusahq Onyx व्हेरियंट Active आणि Ambition या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्कोडाचा क्रिस्टलाइन एलईडी देण्यात आला आहे. जो स्टॅटिक कॉर्नरिंग फंक्शनसह येतो. या कारमध्ये पॅडल शिफ्टर्स आणि हिल होल्ड कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. यात दोन स्पोक स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. स्कोडाची ही कार सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कर्जत लोणावळाजवळ रूळावरून मालगाडी घसरली

Astro Tips For Car: नवीन गाडीची पूजा बायकोकडून का करावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार फायदे

Chapati Side Effects: रात्री चपाती खाल्ल्याने उद्भवतात 'या' समस्या, वेळीच घ्या काळजी

Fish : बुद्धिमान आणि सुंदर असतो हा पाण्यातील मासा, ९९% लोकांना नसेल माहिती

Shivsena: '५० खोक्यांमधील आज १ खोका दिसला' संजय शिरसाटांच्या बेडवरूममधील व्हिडिओवर शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT