Yamaha NMax 155 Saam TV
बिझनेस

Yamaha NMax 155: यामाहाची नवीन दमदार 150cc स्कूटर येतेय, 6 लिटर इंधन टाकी आणि डिस्क ब्रेक; कधी होणार लॉन्च?

साम टिव्ही ब्युरो

आपल्या दुचाकींच्या आकर्षक लूक आणि स्मार्ट फीचर्ससाठी यामाहा प्रसिद्ध आहे. यातच आता कंपनी 150cc इंजिन असलेल्या आपल्या नवीन स्कूटरवर काम करत आहे. ही मिड-सेगमेंट फॅमिली स्कूटर असेल, जी हाय स्पीडसह अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्ससह येईल. आम्ही ज्या स्कूटरबद्दल बोलत आहोत, तिचे नाव आहे Yamaha NMax 155. बाजारात या स्कूटरची Honda PCX 125 शी स्पर्धा होईल.

Yamaha NMax 155 मध्ये 155 cc इंजिन मिळेल. स्कूटर हाय स्पीडसाठी 15 पीएस पॉवर जनरेट करेल. ही स्कूटर 14.4 NM चा टॉर्क जनरेट करेल. सध्या कंपनीने आपल्या मायलेजचा खुलासा केलेला नाही. असा अंदाज आहे की, ज्या पॉवरट्रेनमध्ये ही स्कूटर ऑफर केली जात आहे, ती 40 kmpl पर्यंत सहज मायलेज देईल. ही स्कूटर डिसेंबर 2024 पर्यंत लॉन्च होईल, असा अंदाज आहे.

Yamaha NMax 155 मध्ये मिळणार हे फीचर्स

स्कूटरचे वजन 127 किलोग्रॅम आहे. त्यामुळे कुटुंबातील कोणताही सदस्य ती सहजपणे चालवू शकतो. स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक देण्यात येतील. या स्कूटरला अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

ही स्कूटर 1.30 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये ऑफर केली जाऊ शकते. कंपनी एक प्रकार आणि 3 रंग पर्यायात ही स्कूटर सादर करू शकते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यामध्ये 6.6 लीटरची मोठी इंधन टाकी असेल.

Honda PCX 125

या पॉवरफुल स्कूटरमध्ये 6.2 लीटरची इंधन टाकी आहे. यात 125cc इंजिन मिळू शकते, जे मोठ्या हेडलाइटसह उपलब्ध असेल. ही लो फ्लोअर स्कूटर आहे, ज्यामध्ये स्टायलिश एक्झॉस्ट आहे. या स्कूटरची प्रारंभिक ऑन-रोड किंमत 85,000 रुपये आहे. या स्कूटरमध्ये इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे. जे हाय स्पीडला सपोर्ट करते. याचे वजन 124.4 आहे, ज्यामुळे ही स्कूटर रस्त्यावर नियंत्रित करणं सोपं होतं. Honda PCX 125 मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जाऊ शकते. यात 5 स्पीड ट्रान्समिशन आणि डिस्क ब्रेक असतील. ही स्कूटर डिसेंबर 2024 पर्यंत लॉन्च होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Papaya Face Pack : पपईपासून बनलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा; स्किनवरील डाग चुटकीसरशी होतील गायब

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT