२०२५ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. २०२५ मध्ये सोने आणि चांदीच्या किंमती सर्वाधिक वाढल्या आहेत. सोन्याच्या दराने तर उच्चांक गाठला आहे. त्यानंतर आता चांदीचे दरदेखील खूप वाढले आहेत. चांदीचे दर अडीच लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. चांदीचे दरदेखील झपाट्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांना सोने-चांदी खरेदी करावी की नाही असा प्रश्न पडला आहे.
आठवड्याभरात चांदीचे दर ३२,००० रुपयांनी वाढले (Gold Rate Hike By 32000 Rupees)
दम्यान, मागच्या आठवड्यात चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. चांदीचे दर १ तोळ्यामागे ३२,००० रुपयांनी वाढले आहेत. चांदीचे दर अडीच लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. रोज हे दर वाढताना दिसत आहे. १९ डिसेंबर रोजी चांदीचा दर २,०८,४३६ रुपये होते. आज हे दर २,५८,००० रुपये आहे.
आज चांदीचे दर घसरले
चांदीचे दर मागच्या वर्षभरात आतापर्यंत सर्वाधिक वाढले आहेत. दरम्यान, आज मात्र चांदीच्या दरात किचिंत घसरण पाहायला मिळाली. आज चांदीचा भाव ४००० रुपयांनी घसरला आहे. १ किलोमागे चांदी ४००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. १० ग्रॅममागे ४० रुपयांची घसरण तर १०० ग्रॅममागे ४०० रुपयांची घसरण झाली आहे.
सध्या लग्नसराई आणि सणासुदीचे दिवस सुरु आहेत. या काळात सोने-चांदीचे वाढते भाव सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. अनेकजण सोने-चांदीचे भाव कमी होतील म्हणून थांबले होते. मात्र, आता सोन्याचे दर अजूनच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांना अजून फटका बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.