चांदीचा दर प्रति किलो ३ लाख रुपयांच्या पुढे
एका वर्षात चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ
जानेवारी २०२५ मध्ये दर होता फक्त ९५ हजार
सोन्याप्रमाणे चांदीचे दरही दिवसेंदिवस वाढू लागलेत. चांदीचे वाढते दर पाहता सर्वसामान्य लोकांना चांदी घेणं स्वप्नवत होणार आहे. आज देशातील सराफा बाजारात चांदीचे दर ३,२०,१०० रुपये आहे. किमतीचे नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या चांदीचे दर एका वर्षापूर्वी किती होते? आज चांदीच्या किंमती प्रति किलोच्या पुढे ३ लाख रुपयांच्या पुढे गेलेत.
गेल्या एका वर्षात चांदीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे आणि गेल्या १ वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिलाय. जर तुम्ही १ वर्षापूर्वी चांदीत २ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला किती नफा झाला असता?
एका वर्षापूर्वी म्हणजेच जानेवारी २०२५ मध्ये चांदीची किंमत सुमारे ९५,००० रुपये प्रति किलो होती. तर आज म्हणजेच जानेवारी २०२६ मध्ये चांदीची किंमत प्रति किलो ३लाख आहे. या वर्षाच्या केवळ २१ दिवसांत चांदी ८९,७५५ रुपयांनी महागली आहे. जीएसटीशिवाय चांदीचा दर प्रति किलो ३,२०,०७५ रुपयांवर पोहोचलेत. गेल्या एका वर्षात चांदीच्या किंमतीत जवळपास तीन वेळा वाढ झालीय. जर १ वर्षापूर्वी चांदीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ३०० टक्के दराने परतावा मिळालाय.
जर तुम्ही १ वर्षापूर्वी चांदीत २ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला ३०० टक्के परताव्यानुसार आज तुमच्याकडे ६ लाख रुपये राहिले असते. म्हणजेच काय तुम्हाला सुमारे वर्षाला ४ लाख रुपयांचा नफा झाला असता.
२०२५मध्येही चांदीची किमत वाढली होती. त्यावेळी चांदीची वाढती औद्योगिक मागणीमुळे किमती वाढू लागल्या होत्या. अमेरिकेच्या कर वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची अनिश्चितता देखील या वाढीमागे एक महत्त्वाचा घटक होता. तर आता चांदीच्या किमती वाढण्यामागे जगातील युद्धाची स्थिती आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं ग्रीनलँड धोरण, युरोपीय देशांना दिलेली टॅरिफची धमकी आणि त्यावर युरोपची तीव्र प्रतिक्रिया यामुळे जागतिक व्यापार आणि विकासदराबाबत चिंता वाढलीय. या अनिश्चिततेच्या काळात किरकोळ गुंतवणूकदार सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तांकडे वळत आहेत.
औद्योगिक मागणी: जगभरात 'ग्रीन एनर्जी'वर लक्ष केंद्रित जात आहे. तर चांदी फक्त दागिन्यांपुरती मर्यादित नाही. सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि 5G तंत्रज्ञानामध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
पुरवठ्यात घट: चांदीची मागणी ज्या वेगाने वाढतेय. त्या तुलनेत खाणींमधून तिचे उत्पादन वाढू शकत नाही. काही देशांमध्ये पर्यावरणीय नियमांमुळे नियोजित खाणकाम कमी झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.