

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी 139 एसएमएस सेवा सुरू केली
पीएनआर स्टेटस, ट्रेन वेळ आणि लाईव्ह लोकेशन मिळणार
इंटरनेट किंवा कॉलशिवाय फक्त एका मेसेजवर माहिती
जर तुम्ही नेहमी रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेनं एक भन्नाट फीचर आणलं आहे. याच्या मदतीने रेल्वे प्रवासी रेल्वे आणि आपल्या सीटबाबत सर्व माहिती जाणून घेऊ शकतात. बऱ्याचवेळा रेल्वे प्रवास करत असताना पुढील स्टेशन कोणतं आहे, याची कल्पना प्रवाशांना होत नाही. आपण ज्या ट्रेनने प्रवास करणार आहोत, ती रेल्वे उशिराने धावतेय का वेळेत येते याची माहिती सुद्धा आपल्याला वेळेवर मिळत नाही. प्रवाशांच्या अशाच काही समस्या लक्षात घेऊन रेल्वेनं नवीन एसएमएस सुविधा सुरू केली आहे.
प्रवाशांच्या सोयींमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवीन आणि सोपा उपाय आणलाय. रेल्वेने १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर एसएमएस सेवा सुरू केलीय. या नंबरवर प्रवाशी मेसेज पाठवून आवश्यक माहिती मिळवू शकतील आणि आपली तक्रार नोंदवून शकतील. तेही सोप्या पद्धतीने. आतापर्यंत प्रवाशांना पीएनआर स्थिती, ट्रेन वेळापत्रक किंवा इतर माहिती तपासण्यासाठी १३९ वर कॉल करावा लागत होता.
कॉल कनेक्ट होण्यास वेळ लागत होता आणि कधीकधी नेटवर्क गर्दीमुळे समस्या येत होत्या. त्यामुळे या सुविधेला अधिक सोयीस्कर करण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. भारतीय रेल्वेनं हेल्पलाइन क्रमांक १३९ एसएमएस सेवा सुरू केली आहे. ज्याद्वारे प्रवाशांना एक साधा मेसेज पाठवून महत्त्वाची माहिती मिळू शकेल आणि त्यांच्या तक्रारीही नोंदवू शकतील.
भारतीय रेल्वेचा हेल्पलाइन क्रमांक १३९ हा एक सर्व सुविधांचा क्रमांक आहे. जर तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा नसेल, तरीही तुम्ही एक साधा एसएमएस पाठवून तुमच्या ट्रेनबद्दल माहिती मिळवू शकता.
जर रेल्वेमध्ये पाणीटंचाईसाठी असेल तर : पाणीटंचाई आणि पीएनआर क्रमांकासाठी मदत (उदा.Madad Water Shortage 1234567890)
पार्सलची स्थिती तपासण्यासाठी: पीआरआर पार्सल संदर्भ क्रमांक (उदा. – PRR - 1234567890)
PNR स्टेटस जाणून घेण्यासाठी: PNR<10अंकांचा PNR नंबर> ( उदा. PNR 1234567890)
ट्रेनची स्थिति- (Live Status): AD <ट्रेन नंबर> <स्टेशनचा STD कोड> ( उदा. AD 12403 011 दिल्लीसाठी )
ट्रेन शेड्यूल (Timetable): SCHEDULE <ट्रेन नंबर> (SCHEDULE 12004)
भाडे (Fare Enquiry):FARE <ट्रेन नंबर> (FARE 12403 NDLS PRYJ SL)
सीट उपलब्धता: : SEAT <ट्रेन नंबर> (SEAT 12004 NDLS LKO 1801 SL)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.