Stock Market Closed Saam Tv
बिझनेस

Stock Market Closing : शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले, कोणते शेअर्स ठरले गेनर्स?

Stock Market Closing Update : शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशळी जोरदार आपटला. आज सेन्सेक्स-निफ्टी गडगडले. तरीही आज काही शेअर्स गेनर्स ठरले.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी ओपनिंगलाच जोरदार पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात आज शुक्रवारी सेन्सेक्ससहित निफ्टीही गडगडला. एनएसईचा निफ्टी २४,८०० अंकांवर बंद झाला. त्यानंतर सेन्सेक्समध्येही पडझड दिसून आली.

शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात सकाळी सेन्सेक्सचा व्यवहार ७०० अंकांच्या घसरणीसह सुरु झाला. तर निफ्टीची २५० अंकाच्या घसरणीसह सुरुवात झाली. बँक निफ्टी ५१००० पर्यंत आला होता. मिडकॅप इंडेक्समध्येही ५०० अंकानी घसरला. स्मॉलकॅप इंडेक्सही १८५ अंकांनी घसरला. ऑटो आणि मेटलच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली.

शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात सेन्सेक्स ८८५ अंकांनी घसरून ८०,९८१ वर बंद झाला. निफ्टी २१३ अंकांनी घसरून २४,७१७ वर बंद झाला. तर निफ्टी बँक २१३ अंकांनी घसरून ५१,३५० वर बंद झाला.

शेअर बाजार १-१ टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्स-निफ्टी बंद झाला. निफ्टी हा २४,७०० अंकापर्यंत घसरला. सेन्सेक्सही ९०० अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

कोणते शेअर्स ठरले गेनर्स-लुझर्स ?

आज शेअर बाजारात आयटीसी, एचयूएल, अप्पोलो हॉस्पिटल, डॉ. रेड्डी, नेस्टल इंडिया कंपनीचे शेअर्स गेनर्स ठरले. तर टाटा मोटर्स , आयशर मोटर्स, टाटा स्टील, मारुती, एल अँड टी कंपनीचे शेअर्स घसरले.

अमेरिकेच्या बाजारात पडझड का झाली?

आज शुक्रवारी सेन्सेक्स, निफ्टी व्यतिरिक्त बँक निफ्टी आणि अन्य सर्व इंडेक्सही रेड झोनमध्ये आहेत. अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारात त्याचा परिणाम पाहायला मिळाला. ग्लोबल मार्केटमध्ये घसरण ही मंदीच्या शंकेमुळे झाली आहे. अमेरिकेत मॅन्यूफॅक्चरिंग PMI मध्ये सर्वात अधिक घसरण पाहायला मिळाली. तसेच तिथे बेरोजगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT