शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मंगळवारचा दिवस 'ब्लॅक ट्युजडे' ठरला. या काळात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बाजाराच्या सुरुवातीपासूनच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) निफ्टी खालच्या पातळीवर होते. दिवस संपेपर्यंत बाजारात घसरण मोठी झाल्याचं पाहायला मिळालं.
रेपो रेट कमी केल्याने मार्केटमध्ये सुधार होणार असल्याचं म्हटलं जात होतं, तरीही मार्केटमध्ये घसरण दिसत आहे. एकेकाळी सेन्सेक्स 1200 हून अधिक आणि निफ्टी 300 हून अधिक अंकांनी घसरला होता, पण नंतर काही प्रमाणात सुधारणा झाली. सेन्सेक्स 1,018.20 अंकांनी घसरत 76,293.60 वर आला तर निफ्टी 309.80 अंकांनी घसरून 23,071.80 वर बंद झाला. या घसरणीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली.
त्यामुळे गुंतवणूकदारांना एका झटक्यात 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं. मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पोर्टफोलिओ कायम कमकूवत असल्यानं बाजारातील मंदी दूर होत नाहीये. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी आयटी आणि निफ्टी मेटल सारख्या निर्देशांकांनाही कमजोरीचा सामना करावा लागला. बाजारातील थोडीशी घसरण सामान्य आहे, परंतु बाजाराची सतत कमजोरी ही चिंतेची बाब ठरलीय. बाजार कमकुवत झाल्याचं मुख्य कारण म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सातत्याने केलेली शेअर्सची विक्री.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर परदेशी गुंतवणूकदार भारताकडे वळतील असं वाटतं होतं. कारण ट्रम्प हे चीनविरोधात कठोर असतील. मात्र हे अजून झालेले नाहीये. ट्रम्प सरकार आल्यानंतरही मार्केटमध्ये सुधारणा झालीय नाहीये. सततची विक्री बाजाराच्या स्थिरतेवर परिणाम करू शकते. देशांतर्गत गुंतवणुकीत वाढ झालीय. परंतु एफआयआयचा परतावा बाजारात उत्साहाने भरण्यासाठी आवश्यक आहे.
शेअर बाजारातील घसरणीचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाचक धोरणे. ट्रम्प यांनी आता सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर अतिरिक्त 25% दर जाहीर केलेत. एक्सपर्ट्सनुसार, स्टील आणि अॅल्युमिनियमवर 25% टक्के टॅरिफच्या निर्णयाचा मेक्सिको, ब्राझील, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनामवर सारख्या देशावर याचा परिणाम झालाय. तर टॅरिफचा निर्णय भारताच्या स्टील उद्योगावर परिणाम होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.