Share Market Today : शेअर बाजार जोरदर आपटला, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण, कोणते १० शेअर ठरले टॉप लूजर्स?

Share Market Today in Marathi : आज मंगळवारी शेअर बाजार जोरदार आपटल्याचं पाहायला मिळालं. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. आज कोणते शेअर ठरले टॉप लूजर्स? वाचा
share market News
share market Saam tv
Published On

भारतीय शेअर बाजारात आज मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची दहशत पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे ३० शेअर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी लाल रंगात दिसला. सुरुवातीच्या काही वेळानंतर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरून ७६५०० वर पोहोचला. तर निफ्टी घसरून २३००० वर पोहोचला.

सोमवारसारखी मंगळवारी देखील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्समध्ये ७७,३८४.९८ वर सुरु झाल्यानंतर अचानक घसरण दिसून आली. त्यानंतर पुढे ७६,९३१.७७ वर पोहोचला. दुसरीकडे एनएसई निफ्टी २३,३८३.५५ वर सुरु होऊन काही मिनिटांनी १२० अंकांनी घसरून २३,२६१.२५ वर पोहोचला. मागील दोन दिवसांपासून दोन्ही इंडेक्स लाल रंगात दिसत आहे.

share market News
Gold Price Today : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ! ८७ हजारांचा टप्पा ओलांडला; ऐन लग्नसराईत ग्राहक चिंतेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 'टॅरिफ वॉर' सुरु झाला आहे. मागील आठवड्यात त्यांनी केलेल्या घोषणेमुळे भारतीय व्यापाऱ्यांची चिंता वाढली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्यूमिनियमच्या वस्तूवर आयातशुल्क २५ टक्के लागू करण्याची घोषणा केली होती. या क्षेत्राशी निगिडीत भारतीय कंपन्यांचे अमेरिकेत मोठे व्यवहार होतात. भारतातून अमेरिकेत दरवर्षी अब्जो डॉलरचं स्टील आणि अॅल्यूमिनियम निर्यात केलं जातं.

share market News
Share Market Crash : शेअर मार्केटमध्येही घुसला 'व्हायरस'! पहिल्याच दिवशी सेन्सेक्स १२०० अंकांनी आपटला, ही आहेत ४ कारणं...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर Tata steel, JSW Steel, Nalco च्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. सोमवारी देखील या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी देखील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.

कोणते १० शेअरमध्ये झाली मोठी घसरण?

लार्जकॅप कॅटेगरीमधील zomato share (4.56 टक्के ), Powergrid share (2.05 टक्के), kotak bank share (2 टक्के) आणि tata motors share (1.90 टक्के) हे शेअर घसरणीसह व्यवहार करत आहे.

share market News
Share Market : शेअर बाजारावर 'ट्रम्प इफेक्ट'; सेन्सेक्सची उसळी, ५ शेअरची रॉकेट झेप

मिडकॅपमध्ये कॅटेगरीमध्ये Nam-india share (5.02 टक्के), Thermax share (4.83 टक्के), Emami ltd share (4.67 टक्के), IREDA share (4.20 टक्के) हे शेअर घसरणीसह व्यवहार करत आहे. स्मॉलकॅप कॅटेगरीमध्ये Alicon Share मध्ये घसरण पाहायला मिळाली. हा शेअर 16.05 टक्क्यांनी घसरला. या व्यतिरिक्त NGL Fine शेअर 13.19 टक्क्यांनी घसरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com